Shirdi Sai Trust Murder Case News  Sarkarnama
महाराष्ट्र

Shirdi News : साई संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली!

Shirdi Sai Trust Murder Case News update : दोन्ही कर्मचारी वेगवेगळ्या भागातून साई संस्थानात कामासाठी निघाले होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Mangesh Mahale

Shirdi News: अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे.साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचारी आज पहाटे हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले.

पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवल्याची चर्चा आहे.

सुभाष साहेबराव घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला झाला. तर नितीन कुष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव येथे हल्ला झाला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा देहरकर (रा.श्रीकृष्णानगर) हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जून 2021 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. साईबाबा संस्थानचे कर्मचारी राजेंद्र धिवर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. धिवर यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT