Shiv Sena's bow and arrow symbol Eknath Shinde and uddhav thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Supreme Court Shiv Sena Case: एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढणार ? शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांना डागली तोफ !

Shiv Sena bow and arrow symbol News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.

Sachin Waghmare

New dehli news : सुप्रीम कोर्टात गेल्या सात दिवसापासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना उद्धव ठाकरे यांना शिवसेना चिन्ह देता येत नसेल तर गोठवा मोठी मागणी केली आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव उद्धव ठाकरे यांना द्यावे हे सांगताना एकनाथ शिंदे यांच्या सेनेला धनुष्यबाण चिन्ह देऊ नका, शिंदे यांनी चिन्हाचा बेकायदा वापर केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केली आहे.

यावेळी सिब्बल यांनी युक्तिवादात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिलेला असेल तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकते, असे मत सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान दिले. सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात फरक काय? हेदेखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो, असे परिषिष्ठ 10 मध्ये सांगण्यात आले आहे. राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो, अशी बाजू सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडली. तसेच आमच्याकडे आमदार आहे म्हणजे आम्ही पक्ष आहोत, हा शिंदे गटाचा दावा आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी न्यायालयापुढे सांगितले. आमदारांना राजकीय पक्षांचे ऐकावे लागते. आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात. परंतु राजकीय पक्ष घेता येत नाही, असाही युक्तिवाद यावेळी सिब्बल यांनी न्यायालयापुढे केला.

बंडखोरी केलेले आमदार अन्य कोणत्याही पक्षात विलीन झालेले नाहीत. अगोदर राजकीय पक्ष असतो त्यानंतर विधीमंडळ पक्ष येतो, असेही सिब्बल सर्वोच्च न्यायालयापुढे म्हणाले. पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. संबंधित पक्षाकडे आमदार असो किंवा नको तो पक्ष कायम असतो कारण त्याची नोंद निवडणूक आयोगाकडे असते असाही महत्त्वाचा नियम सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे आता सिब्बल यांच्या युक्तिवादाचा शिंदे गट काय प्रतिवाद करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT