Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदेंची निवड...

shivsena Supreme Court Hearing News : सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
uddhav thackeray, eknath shinde
uddhav thackeray, eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : शिवसेनेतील (उद्धव ठाकरे गट) फुटीनंतर आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, असाही युक्तिवाद त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आमदार सूरत आणि गुवाहाटीला गेले होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ गटाची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टला दिली.

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्या आधी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटालाच 'अधिकृत शिवसेना' म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही बुधवारी कामकाज यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहेत.

uddhav thackeray, eknath shinde
Aditya Thackeray news : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात; एकनाथ शिंदेंकडून फुलप्रूफ तयारी

यावेळी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले, 'शिवसेना फुटल्यानंतर त्यावेळी शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र होते असा युक्तिवाद त्यांनी केला. या गोष्टीनंतर ते आमदार आता पुन्हा नव्याने निवडून आले असले तरीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसा युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे जर न्यायालयाने तो जर योग्य ठरवला तर त्यानंतरचे शिंदेंचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाचे निर्णय हे आपोआप चुकीचे ठरतील, असा युक्तिवाद त्यामागे आहे.

uddhav thackeray, eknath shinde
Shiv Sena UBT petition : फुटलेल्या सहा खासदारांना 'सर्वोच्च' नोटीस; उद्धव ठाकरेंच्या याचिकेची दखल, लोकसभा अध्यक्षांसह एकनाथ शिंदेंनाही उत्तर द्यावे लागणार

विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. कारण पक्ष फुटल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी विधीमंडळ पक्षालाच मुख्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे सिब्बल यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच सुप्रीम कोर्टासमोर मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com