Sudhir Mungantiwar  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Symbol case News : सुप्रीम कोर्टातील शिवसेना सुनावणीवर सुधीर मुनगंटीवार यांचे रोखठोक विधान; म्हणाले, 'आता प्रश्न अपात्रतेचा...'

Shiv Sena symbol case News : सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्याकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून त्यामुळे निकालाआधीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : सुप्रीम कोर्टात गेल्या पाच दिवसापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत. त्यांनी युक्तीवादावेळी विविध प्रश्नाचा भडिमार करीत निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्याकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून त्यामुळे निकालाआधीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत रोखठोक विधान केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर भाष्य करताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'शिवसेनेचे विभाजन झाले तो ५ वर्षाचा कालखंड संपला आहे. आता नवीन कालखंड सुरू झाला आहे. आता प्रश्न अपात्रतेचा असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी निकालाआधीच याबाबत रोखठोक विधान केले आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी सुरु आहे. मात्र, चिन्हाबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोग घेत असतो. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे त्यांना चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे त्याबाबत कोर्टाला निर्णय घेता येईल का ? याबाबत मला तरी शक्यता कमी वाटते, असेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात कुठल्याही समाजाबाबतचा निर्णय घेत असताना प्रत्येकाशी योग्य संवाद झाला पाहिजे. मराठा समाजाच्या उन्नत्तीसाठी राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे येत्या काळात चर्चेतून मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटतील, असेही यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT