Maharashtra assembly debate : महिला आयोगाच्या निधीवरून मुनगंटीवार-मेघना बोर्डीकरामध्ये जुगलबंदी; आठ महिने फाइल पेंडिंग पडल्याचा आरोप

Women’s Commission fund issue News : राज्यातील महिला आयोगाच्या निधीवरून मुनगंटीवार-मेघना बोर्डीकरामध्ये जुगलबंदी रंगल्याचे पाहवयास मिळाले.
Sudhir mungantivar, meghana bordiakar
Sudhir mungantivar, meghana bordiakarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवशेनात विरोधकापेक्षा सत्ताधारी आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गेल्याच आठवड्यात मुनगंटीवार व आशिष शेलार यांच्यात रंगलेली जुगलबंदी ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा राज्यातील महिला आयोगाच्या निधीवरून मुनगंटीवार-मेघना बोर्डीकरामध्ये जुगलबंदी रंगल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी मुनगंटीवार यांनी गेल्या आठ महिन्यापासून फाइल पेंडिंग पडल्याचा आरोप करीत राज्य सरकारला घेरले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

विधानसभेत सोमवारी भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यात राज्य महिला आयोगाच्या निधीवरून जुगलबंदी पाहायला मिळाली. मुनगंटीवार यांनी मंजूर निधी आणि प्रत्यक्षात खर्च न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, आयोगाचे अधिकार मंत्रालयाकडे असण्यावर आक्षेप घेतला.

Sudhir mungantivar, meghana bordiakar
Congress News : काँग्रेस हिंगोलीत कमबॅकच्या तयारीत; प्रज्ञा सातव, अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्षच मैदानात!

प्रश्नोत्तराच्या तासात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी राज्य महिला आयोगाच्या कामाचा आढावा घेताना विचारले की, आयोगाला मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात का मिळत नाही? आयोगाची एक महत्त्वाची फाईल गेल्या आठ महिन्यांपासून मंत्रालयात का पेंडिंग आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. महिला आयोगाला स्वायत्तता असली, तरी प्रत्येक खर्चाच्या फाईलसाठी मंत्रालयाची परवानगी का लागते? यामुळे आयोगाचे संशोधन आणि जनजागृतीचे कार्यक्रम ठप्प झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Sudhir mungantivar, meghana bordiakar
NCP News: राष्ट्रवादीनं 'हवेली' ताब्यात घेतली!अपक्षाच्या पाठिंब्यानं सत्तेची गणिते जुळली!

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आरोप केला की महिला आयोगाला निधी वेळेवर आणि पुरेसा मिळत नाही, ज्यामुळे जनजागृती आणि संशोधन कार्यावर परिणाम होत आहे. मुनगंटीवार यांनी फाईल्स मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यासोबतच मंत्रालयाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप देखील तयांनी सभागृहात केला.

Sudhir mungantivar, meghana bordiakar
Shivsena-BJP News : युतीचा विसर पडला? राष्ट्रवादीला हाताशी धरत शिवसेनेनं उलटवला डाव; माजी आमदार ज्ञानराज चौंगुलेंचा भाजपला दणका

यावर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, आयोगाने मागितलेला निधी दिला गेला आहे आणि कोणतीही मागणी प्रलंबित नाही. सरकारने कोणताही निधी रोखलेला नाही. आयोगाच्या मागणीनुसार वेळोवेळी निधी दिला जातो. २०२६-२७ साठी १८.३५ कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या चर्चेत विरोधी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही सहभाग घेत निधीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sudhir mungantivar, meghana bordiakar
Shivsena-BJP News : युतीचा विसर पडला? राष्ट्रवादीला हाताशी धरत शिवसेनेनं उलटवला डाव; माजी आमदार ज्ञानराज चौंगुलेंचा भाजपला दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com