Eknath Shinde London : शिवसेनेचे मुख्य नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटिश संसदेतील दोन स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये तीन पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारांवरून, शिवसेना आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची बाजू मांडणारे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी डिवचले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तंतोतंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेऊन वागत आहेत. कुणाकडे जर भरपूर पैसे असतील, तर हे असले पुरस्कार मिळवून देण्यासाठी काम करणारे दलाल सुद्धा आहेत, असा खोचक टोला अॅड. असीम सरोदे यांनी लगावला आहे.
कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळत असलेला पुरस्कार लंडनच्या संसदेतर्फे दिला जात नाही, हे आवर्जुन सांगितले आहे.
इंडो-युरोप बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम या खासगी संस्थांतर्फे ते पुरस्कार दिले जाता आहे. युके पार्लमेंटमध्ये ते पुरस्कार दिले जातात, म्हणजे ते युके गव्हर्नमेंटतर्फे दिले जातात, असा गैरसमज कुणीच करून घेऊ नये, असेही अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे तंतोतंत नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पावलावर पाऊल ठेऊन वागत आहेत, असा खोचकपणे टिप्पणी करत, कुणाकडे जर भरपूर पैसे असतील, तर हे असले पुरस्कार मिळवून देण्यासाठी काम करणारे दलाल सुद्धा आहेत, असा टोला देखील लगावला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ब्रिटिश संसदेतील दोन स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये तीन पुरस्कारांमध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, तर ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान दिला जाणार आहे. एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी आज लंडनला रवाना झाले आहेत.
असीम सरोदे यांच्या या सोशल कमेंटवरून, एकनाथ शिंदे शिवसेना प्रत्युत्तर देते का, याकडे आता लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाच्या कायदेशीर लढाई सुरू झाल्यापासून असीम सरोदे महायुती सरकारच्या धोरणांवर, वारंवार टिप्पणी करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.