Mira Bhayandar Meat Ban : मिरा-भाईंदरमध्ये पर्युषणावरून नवा वाद; मांसविक्री बंदी, भाजपच्या मागणीवर मराठी एकीकरण समितीचा रुद्रावतार

Paryushan meat ban demand sparks fresh controversy in Mira-Bhayandar as Marathi Ekikaran Samiti warns of protest : भाजप नगरसेवक भरत कोठारींची 16 सप्टेंबरपर्यंत मांसविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी; समितीचा आंदोलनाचा इशारा
Mira Bhayandar Meat Ban
Mira Bhayandar Meat BanSarkarnama
Published on
Updated on

Mira Bhayandar meat ban during Jain Paryushan : ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी विशेषतः हिंदी, गुजराती आणि मारवाडी यांच्यात सणासुदीच्या काळात वादाची ठिणगी पडली आहे.

भाजपचे नगरसेवकांनी जैन धर्मियांच्या पर्युषण पर्व काळात मांसविक्री बंद ठेवण्याची केलेल्या मागणीला मराठी एकीकरण समितीने आक्रमकपणे विरोध केला आहे. यावरून पुन्हा एकदा मिरा-भाईंदर शहरात मराठीविरुद्ध अमराठी वाद उफळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

भाजप नगरसेवक भरत कोठारी यांनी जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाचे औचित्य साधून मिरा-भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) 16 सप्टेंबरपर्यंत मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. शहरातील कत्तलखाने देखील बंद करावेत, असेही नगरसेवक कोठारी यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे.

भाजपचे (BJP) नगरसेवक कोठारी यांच्या या मागणीवर मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत, पर्युषण काळात मांस-मासे विक्री बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

Mira Bhayandar Meat Ban
Navnath Waghmare On Eknath Shinde : ‘पायातली चप्पल डोक्यावर घेतली’; जरांगेंवरून ओबीसी नेत्याचा थेट एकनाथ शिंदेंना टोला

मिरा-भाईंदरमध्ये संघर्ष, दंगे आणि सामाजिक तेढ वाढेल, असे निर्णय महापालिका प्रशासनाने घेऊ नयेत, अशी भूमिका समितीच्यावतीने गोवर्धन देशमुख यांनी मांडली. धर्म आणि श्रद्धा प्रत्येकाने स्वतः जपावी, ती इतरांवर लादू नये, असेही देशमुख यांनी म्हटले.

Mira Bhayandar Meat Ban
Chandrakant Raghuvanshi BJP : ‘भाजपचे लोक लग्नातही कमळाचा बिल्ला लावतात’; शिंदे शिलेदाराचा जिव्हारी लागेल, असा खोचक टोला

संविधानाने नागरिकांना दिलेले खान-पानाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे आणि कोणावरही बंधने लादू नयेत, याकडे समितीने लक्ष वेधले. आपण इंग्रज नाही, तर लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात, याचे भान ठेवा, असा शब्दात समितीने प्रशासनाला सुनावले आहे.

प्रशासनाने तुघलकी निर्णय स्थानिकांवर लादू नयेत, अन्यथा याचे परिणाम आंदोलनाद्वारे दिसतील, असाही इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. प्रशासनाने हा निर्णय लादल्यास, त्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाची तयारी देखील समितीद्वारे सुरू करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com