Opposition Leader Ambadas Danve News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve On Fadanvis : `फेस टू फेस`, चा दावा करता मग हुडी घालून रात्री बाहेर का पडावे लागले ?

Maharashtra : शिंदे-फडणवीस-पवार या ट्रिपल इंजिन सरकारच्या प्रत्येक टीकेला दानवे शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Shivsena (UBT) : शिर्डी येथे झालेल्या `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. (Ambadas Danve On Fadanvis) आमचे सरकार हे फेसबुक सरकार नाही, तर `फेस टू फेस`, सरकार असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीसांच्या टीकेला काही तासातच ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

यावेळी जुन्या घटनांची आठवण देखील करून देण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या या कामगिरीत आघाडीवर आहेत. (Devendra Fadanvis) शिंदे-फडणवीस-पवार या ट्रिपल इंजिन सरकारच्या प्रत्येक टीकेला दानवे खास (Shivsena)शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देतांना दिसत आहेत.

फडणवीसांच्या फेस टू फेसला देखील त्यांनी असेच कडक उत्तर दिले. (Maharashtra) या संदर्भात ट्विट करत दानवे म्हणाले, 'फेस टू फेस' सरकार... सोडून बोला देवेंद्र फडणवीसजी. सरकारचे कारभारी अर्थात तुमच्या तिघांचे किस्से लोकांना ज्ञात आहेत!

'फेस टू फेस' होते तर मग तुम्हाला हुडी घालून रात्रीच्या वेळी बाहेर का पडावं लागत होतं? 'फेस टू फेस' होते तर काकांना भेटून बाहेर पडताना अजित पवारांना गाडीत आडवं झोपून का जावं लागलं?

'फेस टू फेस' होते तर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी रुग्णवाहिकेत बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुरत का गाठावी लागली? असे टोले लगावत दानवे यांनी फडणवीसांच्या `फेस टु फेस`, ला आरसा दाखवल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT