Subhas Desai On Mahavikas Aghadi : ठाकरेंचे उद्योगपतींशी चांगले संबंध, म्हणून महाराष्ट्रात गुंतवणूक ; देसाईंनी डिवचले..

Shivsena UBT : राज्यात ६ लाख कोटींची गुंतवणूक आली त्याच कारण उद्धव ठाकरे यांचे उद्योगपतींसोबत असणारे संबंध.
Subhas Desai On Mahavikas Aghadi
Subhas Desai On Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष गेल्या वर्षभरापासून पहायला मिळत आहे. (Subhas Desai On Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील गुंतवणूक वाढल्याचा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सातत्याने केला.

Subhas Desai On Mahavikas Aghadi
Ambadas Danve : शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी ! दानवेंनी टीकेची संधी साधली..

तर या दोघांचा दावा खोडून काढतांना वेदांता फॉक्सकॉनसह ज्या कंपन्यांच्या प्रकल्पाची उभारणी महाराष्ट्रात होणार होती, त्या कंपन्यांशी कराराच झाला नव्हता असा आरोप आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने केला होता. (Shivsena) नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उद्योग विभागाची श्वेतपत्रिका देखील आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढली होती.

हा वाद अजूनही सुरूच आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एक फोटो ट्विट करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. हा फोटो आहे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) मुख्यमंत्री असतांना त्यांनी उद्योगपतींसोबत घेतलेल्या बैठकीचा.

या फोटाचा हवाला देत देसाई यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या काळात राज्यात ६ लाख कोटींची गुंतवणूक आली त्याच कारण उद्धव ठाकरे यांचे उद्योगपतींसोबत असणारे संबंध. तेच सरकार गेल्यानंतर अनेक उद्योग राज्याबाहेर गेले.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपतींसोबत केलेली अशी एक तरी मिटिंग दाखवा, असे आव्हान देत म्हणूनच पुन्हा एकदा ठाकरे सरकार, असा टोला लगावला आहे. आता देसाई यांच्या या दाव्याला शिंदे-फडणवीस सरकारकडून कोण प्रत्युत्तर देणार ? हे पहावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com