Sanjay Shirsat Visits Abhijeet Dipke Home sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : शिवसेनेचे मंत्री अभिजीत दिपकेंच्या घरी, आंदोलनानंतर भेटीचे कारणही केले स्पष्ट!

Sanjay Shirsat Visits Abhijeet Dipke Home : अभिजीत दिपके याच्या कुटुंबियाशी आपली अनेक वर्षांची ओळख आहे, ते आपले दूरचे नातेवाईक देखील आहेत, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे

Jagdish Pansare

Shivsena Politics : दिल्लीच्या जंतरमंतरवर 36 दिवस आंदोलन करून जगभरात पोहचलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील काॅक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांची भेट शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतीच घेतली. केंद्रातील मोदी सरकार आणि त्यामधील केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावरची लढाई लढलेल्या अभिजीत दिपकेच्या घरी शिवसेनेचे मंत्री गेल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या गेल्या.

अभिजीत दिपके याच्या कुटुंबियाशी आपली अनेक वर्षांची ओळख आहे, ते आपले दूरचे नातेवाईक देखील आहेत, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतरच आपण दिपके यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी का आलो? याचाही खुलासा संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

नीट पेपरफुटीवर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाची जगभरात चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात अभिजीत दिपके याचे कुटुंब राहते. हा भाग शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात येतो.

आंदोलनानंतर काल संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचाही खुलासा केला. राजकारण हा अभिजित दिपके किंवा त्याच्या कुटुंबीयाचा विषय नाही. परंतु काही लोक अभिजीतला बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला.

आधी भेटलो असतो तर..

अभिजीतला मी लहानपणापासून पाहिलंय. माझा मुलगा त्याच्या बहिणीच्या हातून राखी बांधतो. दिपके हे माझे जवळचे आहे नातेवाईक आहेत आणि मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करणे गरजेचे वाटत होते. त्यामुळे मी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ते माझ्या कार्यक्रमाला येतात, मी पण त्यांच्या घरी गेलो.

आंदोलन सुरू असताना जर दिपकेच्या घरी भेट दिली असती तर त्यावर चुकीच्या बातम्या आल्या असत्या. कुणाचा मेसेज घेऊन गेलो, याची चर्चा रंगली असती. त्यामुळे आंदोलन झाल्यानंतर आपण दिपकेच्या घरी भेट दिली, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

राजकारणात यावे की नाही हा निर्णय त्याचा

अभिजीत दिपके यांनी माजी मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून खासदारकीची ऑफर असल्याची चर्चा सुरू झाली. यावर अभिजीत दिपकेने भावनेच्या भरात आंदोलन केले. पण राजकारण हा त्याचा किंवा त्याच्या कुटुंबीयांचा विषय नाही. अभिजीतने नोकरी करावी आणि सुखात राहावं असं त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे. आता राजकारणात त्याने यावे की नाही? हा त्याचा निर्णय त्याने घ्यावा, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT