ShivSena MLA Disqualification  Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena MLA Disqualification : ...अखेर ठाकरेंनी पाऊल उचललंच; नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं

Supreme Court : नार्वेकरांनी निकाल देताना शिवसेनेच्या घटनेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून घटनेत नोंद नसल्याचे सांगितले.

Roshan More

Delhi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. तसेच शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला होता. आम्ही न्यायालयात जाणार, असे ठाकरे गटाचे नेते सांगत होते. मात्र, निकालानंतर चार दिवसांनंतरही ठाकरे गट न्यायालयात गेला नव्हता. मात्र, अखेर आज (सोमवारी) ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निकालाविरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. नार्वेकरांनी निकाल देताना शिवसेनेच्या घटनेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून घटनेत नोंद नसल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या शिवसेनेच्या घटनेचा संदर्भ दिला. मात्र, शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयी महत्त्वाचा खुलासा करीत पुरावे सादर केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल परब यांनी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख नियुक्ती झाल्यानंतर घटनेत बदल केला होता. ती कागदपत्रे निवडणूक आयोगालादेखील सादर केली होती. त्याचा पुरावा सादर केला. आता हाच पुरावा न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. ठाकरे गट याचिकेद्वारे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला, असा ठपका ठेवणार आहे.

संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष विकले गेले आहेत. त्यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच या सगळ्या मागचा सूत्रधार भाजप असल्याची टीकादेखील राऊत यांनी वेळोवेळी केली आहे.

जनतेच्या न्यायालयात जावे लागणार...

न्यायालयात ठाकरे गट गेला असला तरी अंतिम निर्णय कधी येणार? न्यायालय यावर कधी सुनावणी घेणार, याची उत्तरे अजून मिळाली नाहीत. मात्र, लोकसभा निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईसोबत ठाकरे गटाला जनतेच्या न्यायालयात जाऊन लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावे लागेल, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT