Karad : शिवसेना कुणाची याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून शिंदे गटाची शिवसेना आणि शिंदे-ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ठाकरे गटाला रडीचा डाव न खेळता न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यावर संजय राऊतांनी शंभूराज देसाईंसह विधानसभा अध्यक्ष शंभूराज देसाई यांना टार्गेट केले आहे.
शंभूराज देसाईंनी (shambhuraj desai) ठाकरे गटाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा कोर्टात जावे, असे म्हटले होते. त्याला आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर देत शंभूराज देसाईंना त्यांच्या आजोबांची आठवण करून दिली. शंभूराज देसाईंचे आजोबा हे न्यायप्रिय माणूस होते. त्यांचा इतिहास एकदा शंभूराज देसाई यांनी तपासून पाहावा, असा टोला राऊत यांनी लगावला.
बाळासाहेब देसाई यांच्या बद्दल आजही आम्ही आदर्श बाळगतो. शंभूराज देसाईंना त्यांचा विसर पडला असेल. त्यांना त्यांच्या आजोबांचे चरित्र वाचवे. त्यांच्याकडे ते नसेल तर आम्ही ते त्यांना देऊ, असे देखील राऊत म्हणाले. कोर्टात जाण्याच्या शंभूराज देसाई यांच्या सल्ल्याची देखील राऊत यांनी खिल्ली उडवत विधानसभा अध्यक्ष राऊल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला. या निकालावर तुम्ही समाधानी नसाल, तर वरच्या कोर्टात जा, असे शंभूराज देसाईंनी सुनावले असले तरी ठाकरे गट निकालानंतर लगेच सुप्रीम कोर्टात गेला आहे. अनिल परब यांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे नार्वेकर यांनी निकाल दिला त्यामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या घटनेत जे बदल केले ते निवडणुक आयोगाला कळवण्यात आले होते. असे सांगितले. त्यामुळे आता अपात्रता प्रकरणाचा निकाल न्यायालयातच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.