Sanjay Shirsat Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : 'गांधींच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण दुर्दैवी'; आमदार शिरसाट यांची जहरी टीका

Sanjay Shirsat venomous criticism on Rahul Gandhi : काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आमदार संजय शिरसाट यांची टोकाची भाषा वापरली.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली.

"राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते आणि काँग्रेसच्या लाचार लोकांनी त्यांच्याच हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण केले, हे दुर्दैवी आहे", अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केली.

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याला भाजपने जोरदार विरोधात केला. कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. महायुतीमधील शिवसेना पक्षाने देखील राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावर टीका केली. शिवसेनेचे (Shiv Sena) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका जीभ घसरली.

संजय शिरसाट यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नौटंकी केल्या म्हटलं. "राहुल गांधी यांनी ठरल्याप्रमाणं नौटंकी केली. विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा केली आणि आज कोल्हापुरात आल्यावर एका चालकाच्या घरी जेवल्याचे कौतुक जगाला दाखवले. काँग्रेसची नेहमची दुटप्पी भूमिका राहिली आहे. एखाद्या लहान मुलाला उचलायचे, एखाद्या वयोवृद्ध माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचे दर्शन घ्यायचे. या नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले", अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

संजय शिरसाट यांनी आमच्या महाराजांचे नाव अभिमानाने आणि स्वाभिमानाने घेतले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, असेच नाव उच्चारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'यापूर्वी देखील राहुल गांधींना महाराजांचा पुतळा देण्यात आला होता. तो त्यांनी एका हाताने उचारलला होता. आज राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं, हे दुर्दैवी आहे. लाचार महाविकास आघाडीला गांधी यांचे पाय चेपावे लागतात. दिल्लीत जावे लागते. लाचारांनी हिंदुत्वाचे नाव देखील घेऊ नये', अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

राहुल गांधी कोल्हापुरात काय म्हणाले

कोल्हापुरात राहुल गांधी भाषणात म्हणाले, "भाजप शिवाजी महाराजांची विचारधारा मानत नाही. हे लोक 24 तास विचारधारेच्या विरोधात काम करत असतात. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. विचारधारेचा लढा आहे.शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढली आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. आम्ही त्यांच्या मार्गावर चालत आहोत. लोकांच्या 'न्याय हक्कासाठी' लढत राहणार आहोत".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT