Anand Dubey on Bangladesh Violence Sarkarnama
महाराष्ट्र

Anand Dubey on Bangladesh Violence : 'जर आपले लोक तिथे सुरक्षित नसतील, तर जे बांग्लादेशी इथे आहेत, त्यांनाही..' ; ठाकरे गटाचं मोठं विधान!

India On Bangladesh Violence : बांग्लादेशमधील या परिस्थितीवर भारताचं बारकाईन लक्ष आहे. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती.

Mayur Ratnaparkhe

Shiv Sena Thackeray group on Bangladesh Violence : बांग्लादेशात सध्या अराजकता परसलेली आहे. सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून, देशही सोडलेला आहे. तरी देखील उपद्रवी अद्यापही बांग्लादेशात जाळपोळ, तोडफोड करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंदू नागरिकांची घरे आणि मंदिरांना लक्ष्य केलं जात असल्याचं समोर आलं आहे.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'बांग्लादेशात ज्या प्रकारे हिंदू बंधू-भगिनींवर अत्याचार केले जात आहेत. मंदिरांची तोडफोड केली जात आहे, हे दुर्दैवी आहे. परंतु यापेक्षाही जास्त दुर्दैवी हे आहे की, केंद्रातील भाजप सरकार काय करत आहे?, परराष्ट्रमंत्री काय करत आहेत?. जर आपली लोकं तिथे सुरक्षित नसतील, तर जे बांग्लादेशी किंवा रोहिंगे इथे आहेत, त्यांनाही आपल्या देशातून हाकललं पाहीजे. त्यांची इथे काही आवश्यकता नाही.' असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केलं आहे.

दरम्यान, बांग्लादेशमधील या परिस्थितीवर भारताचं बारकाईन लक्ष आहे. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. यामध्ये प्रामुख्याने बांग्लादेशात सध्या असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली गेली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर(S Jaishankar) यांनी बैठकीत भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशात जवळपास 13,000 भारतीय आहेत. परिस्थिती इतकी भीषण नाही की तिथे अडकलेल्या नागरिकांना लगेच बाहेर काढावे लागेल, असे जयशंकर यांनी बैठकीत सांगितले.

त्याचप्रमाणे 8,000 विद्यार्थी आतापर्यंत देशात परतले आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती कशीही असेल, आम्ही ती आपल्या सर्वांना कळवू, असे सांगत जयशंकर यांनी बांग्लादेशवर भारताची करडी नजर असल्याचे स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT