S. Jaishankar News: 'लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप..!' परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं खळबळजनक विधान

Loksabha Election 2024 : येत्या पाच वर्षांत जागतिक राजकारणात आणि सामरिक स्थितीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची...
S. Jaishankar News
S. Jaishankar NewsSarkarnama
Published on
Updated on

नीलेश खरे

Mumbai News : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रचारसभांचा धडाका, हेवे-दावे,आरोप- प्रत्यारोप यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता देशाचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.

भारतातील लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा,आंतरराष्ट्रीय संस्थांचा हस्तक्षेप होत असल्याचे दावा परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केला आहे.त्यांच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नव्या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

S. Jaishankar News
Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी मुंबईतील विविध माध्यमांच्या वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतातील निवडणुका,युरोपीय देशांसोबत असलेले भारताचे संबंध,पीओके,आगामी काळातील देशाची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर थेट भाष्य केले.

जयशंकर म्हणाले,'लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) डिजिटल मीडियाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय संस्था मोदीविरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.या आधीच्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीनं विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही देशांच्या विशिष्ट विचारधारेच्या मानसिकतेमुळे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात येत आहे.पण मला वाटत नाही ते त्यांच्या या प्रयत्नात यशस्वी होतील',असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'वॉर तो रुकवा दी पापा' याबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांबाबत प्रश्नाला उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले,'कीव्ह शहरातील भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी तातडीने शहर सोडावं असा आदेश आम्ही दिला.कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' ही मोहीम राबवण्यात आली.

त्याचवेळी रशियानं कीव्हवर गोळीबार सुरु केला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधला आणि रशियाला गोळीबार थांबवण्यास सांगितले, त्यानंतर लगेचच गोळीबार थांबवल्यानं भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यात यश आल्याचं जयशंकर म्हणाले.

S. Jaishankar News
Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar : मतदान संपण्याआधीच पुण्यात झळकले भावी खासदाराचे बॅनर!

दरम्यान, नाम चळवळीचं जागतिक स्थान हे कमकुवत झालं असून नॉन अलायनमेंट मुव्हमेंट प्रभावहीन झाली आहे.असं असलं तरीही भारत या चळवळीत आपलं स्थान राखून आहे असं सांगताना येत्या पाच वर्षांत जागतिक राजकारणात आणि सामरिक स्थितीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यताही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी बोलून दाखवली.

(Edited By Deepak Kulkarni)

S. Jaishankar News
Udayanraje News : होऊ दे खर्च ! लोकसभेत उदयनराजेंचा सर्वाधिक तर बिचुकलेंचा किती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com