Sushma Andhare, Mahendra Thorve Sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare Video : नगसेवकाला मारहाणीचा व्हिडिओ अंधारेंकडून व्हायरल; पुन्हा आमदार थोरवे टार्गेट

MLA Mahendra Thorve Shivaji Sonawane Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुधवारी शिवाजी सोनवणे याचा एक मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला होता.   

Rajanand More

Mumbai : कर्जत तालुक्यातील नेरळ येथे भररस्त्यात कारचालकाला दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवाजी सोनवणे याला अटक केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.

अंधारे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक टोळके लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत असल्याचे दिसते. मात्र, ही मारहाण कुणाला होतेय, हे स्पष्ट होत नाही. मारहाण होत असलेली व्यक्ती माथेरानचे नगरसेवक असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे.

अंधारे यांनी हा व्हिडिओ 25 जून 2022 रोजीचा असल्याचे म्हटले आहे. ’माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांना रस्त्यावर मारहाण करतानाचा हा व्हिडिओ. यातही शिवा सोनवणे हा आमदार महेंद्र थोरवेंचा पोसलेला गुंड तीन नंबरचा आरोपी होता. या सगळ्यांचा वापर दहशत पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जातो, असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान, आरोपी शिवाजी सोनावणे हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, आमदार थोरवे यांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळले आहेत

मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. मात्र, माझ्या परिचयाची आहे. ज्याला मारहाण झाली आणि जो मारहाण करतोय ते दोघे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचं थोरवे यांनी सांगितलं आहे. त्यानंतरही पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी थोरवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटले होते ठाकरे गटाने?

नेरळ येथे कारचालकाला त्याच्या कुटुंबाच्या समोरच बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाने बुधवारी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. मारहाण करणारी व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT