Mumbai News, 12 Sep : कर्जत तालुक्यातील नेरळ येथे भररस्त्यात एक व्यक्तीने कारचालकाला दांडक्याने मारहाण केल्याच्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ बुधवारी (ता.11 सप्टेंबर) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अशातच आता या मारहाण प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. ही मारहाण करणारा व्यक्ती शिवाजी सोनावणे (Shivaji Sonawane) याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिवाजी सोनावणे हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
मात्र, आमदार थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. मात्र, माझ्या परिचयाची आहे. ज्याला मारहाण झाली आणि जो मारहाण करतोय ते दोघे शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते असल्याचं थोरवे यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण पेटलं असतानाच आता नेरळ पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.