Uddhav Thackeray, Narendra modi Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena UBT news : ठाकरेंच्या खासदारांना हवी मोदींच्या कॅबिनेटमध्ये जागा? फुटीची चर्चा सुरू असताना चार खासदारांची दिल्लीवारी

Modi Cabinet Expansion : ऑपरेशन टायगरला रोखण्यासाठी ठाकरेंकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खासदारांशी वैयक्तिक संपर्कात राहण्याची जबाबदारी काही नेत्यांवर टाकल्याची चर्चा आहे.

Rajanand More

Shiv Sena Split News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सहा खासदारांसह काही आमदारही ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून केला जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या खासदारांना केंद्रात मंत्रिपद हवे असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व नऊ खासदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलविले होते. मात्र, प्रत्यक्षात चारच खासदार बैठकीला हजर होते. उर्वरित खासदार ऑनलाईन हजर झाल्याची माहिती नेत्यांकडून देण्यात आली. ठाकरेंच्या नेत्यांकडून 'ऑपरेशन टायगर' ही नुसती अफवा असल्याचा दावा केला जात आहे.

बैठकीला पाच खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थिती न लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यातच बुधवारी ठाकरेंच्या सेनेचे चार खासदार दिल्लीत असणार आहेत. राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत. तर खासदार अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे बुधवारी दिल्लीत असणार आहेत.

संसदीय समितीच्या बैठकीसाठी हे खासदार दिल्लीवारी करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एकीकडे खासदारांच्या फुटीच्या चर्चा सुरू असताना ही दिल्लीवारी होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच फुटण्याच्या तयारीत असलेले खासदारांपैकी एका खासदारांना मंत्रिपद देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात असल्याचे वृत्त आहे. 'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रि‍पदावरूनच चर्चेचे घोडे अडले आहे.

ऑपरेशन टायगरला रोखण्यासाठी ठाकरेंकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खासदारांशी वैयक्तिक संपर्कात राहण्याची जबाबदारी काही नेत्यांवर टाकल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा स्थापना दिन १९ जून रोजी आहे. त्यादिवशी ठाकरेंच्या शिवसेनेची परीक्षा असणार आहे. या कार्यक्रमाला किती आमदार, खासदार उपस्थित राहून आपण एकजुट असल्याचा संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT