Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti MLC : राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचं प्रकरण हायकोर्टात; आजचा शपथविधी होणार का?

Shiv Sena UBT Governor Nominated MLC : राज्यपालांनी सोमवारी सात आमदारांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला असून आजच शपथविधी होणार आहे.

Rajanand More

Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद हायकोर्टात प्रलंबित असतानाच आता सात आमदारांच्या नियुक्तीचा वादही हायकोर्टात पोहचला आहे. आजच या आमदारांचा शपथविधी होणार असून त्याला विरोध करणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 12 पैकी 7 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्याला राज्यपालांनीही सोमवारी रात्री हिरवा कंदील दाखवला. या आमदारांचा शपथविधी मंगळवारी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदारांना शपथ देणार आहेत.

भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 अशा एकूण 7 जणांची नावे निश्चित झाली आहे. त्यांच्या शपथविधीला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका ठाकरे गटाकडून हायकोर्टात करण्यात आली होती. तसेच आधीचे प्रकरण प्रलंबित असताना सात आमदारांची नियुक्ती करणे असंविधानिक असल्याचेही ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे.

हायकोर्टाने या याचिकेची तातडीने दखल घेतली. मात्र, शपथविधीला तातडीन स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सात आमदारांच्या शपथविधी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनंतर विधान परिषदेत 12 पैकी सात आमदार दाखल होणार आहेत.

दरम्यान, सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेली सात जणांची यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आली होती. राज्यपालांनी या सात जणांची नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. यात भाजपकडून चित्रा वाघ,विक्रांत पाटील आणि बाबू सिंग राठोड, राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी तसेच शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT