Sanjay-Lakhe-Patil-Uddhav-Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT Internal Politics : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत मोठ्या नेत्याने सोडली साथ! सांगलीच्या जागेचे सेटींगही सांगितले

Sanjay Lakhe Patil Resigns : अंबादास दानवे हे मराठवाड्यात जो पक्षाचा कार्यक्रम राबवत आहेत त्याची मूळ संकल्पना आपली होती. मात्र दानवे यांनी तो चोरला. आणि फुकटचे कौतुक पदरात पाडून घेत आहेत, असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला आहे.

Roshan More

Sanjay Lakhe Patil News : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक तयारीत गुंतलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी गंभीर आरोप करत आपला पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला आहे. तसेच संजय राऊत, अंबादास दानवे यांना टार्गेट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत तिकीट देतो, असा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिला होता. मात्र त्यांनी तो पाळला नाही. असे लाखे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सांगली लोकसभेच्या जागेवर संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यासोबत सेटींग करून पराभव पदरात पाडून घेतल्याचेही लाखे पाटील यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे यांच्यावर हल्लाबोल करत लाखे पाटील म्हणाले की, मला जाणूनबुजून पक्षातून डावलण्यात येत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले जात होते. कुठलीही जबाबदारी दिली जात नव्हते. मुळात मला कामाची संधी दिली गेली नाही. मला काम कसे मिळणार नाही, हेच पाहिले गेले. वैयक्तिक जे काम आहे. संघटनात्मक जे काम आहे त्यापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळे येथून पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम न करण्याचे मी ठरवले आहे.

अंबादास दानवे हे मराठवाड्यात जो पक्षाचा कार्यक्रम राबवत आहेत त्याची मूळ संकल्पना आपली होती. मात्र दानवे यांनी तो चोरला. आणि फुकटचे कौतुक पदरात पाडून घेत आहेत. जालनच्या जागा आपल्या पक्षाला कशी मिळणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. आणि रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावले आहे.

...माझ्यावर हसत राहिले

आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील 'शिष्यत्व धर्म' निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला... आपल्या डोळ्यासमोर.

त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले.

'सामना'मध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले. सामनाच्या बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT