Bala Nandgaonkar Sarkarnama
महाराष्ट्र

Bala Nandgaonkar : मतदानाआधी नांदगावकरांना बाळासाहेबांचे 'ते' शब्द आठवले अन्...! शिवसैनिक, मनसैनिकांच्या डोळ्यात तरळले पाणी

MNS Shiv Sainiks emotional reaction : मतदानाआधी नांदगावमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द आठवताच शिवसैनिक व मनसे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

Rashmi Mane

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या जोरदार प्रचारामुळे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. प्रत्येक पक्षाने आपली ताकद पणाला लावत सभा, रॅली, पदयात्रा आणि माध्यमांतून प्रचाराचा जोर वाढवला होता. मात्र आता प्रचाराचा अंतिम टप्पा संपत असून काही तासांतच प्रचाराच्या सगळ्या हालचाली थंडावणार आहेत.

राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहुन भावनिक साद घातली आहे. या पत्रातून त्यांनी थेट मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी हात जोडून विनंती करतो, मराठी माणसा जागा हो ! रात्र वैऱ्याची आहे! मुंबई आपली आहे.

मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपलाच आहे. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे. मुंबई माझी आहे. मी मुंबईचा आहे. मी मनसेचा नेता म्हणून नाही, तर तुमचा आपला बाळा म्हणून सांगतो. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, ही आपल्या अस्मितेची, आपल्या भविष्यातील मुंबईची आणि मराठी माणसाच्या हक्काची आहे. घराघरात जा, गल्लोगल्ली फिरा, माणसामाणसांत विश्वास जागवा. मत द्या मतदार घडवा आणि युतीचे उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी करा.

बाळा नांदगावकर यांचे संपूर्ण पत्र

मी आपलाच बाळा

तुमच्यातीलच एक. काल शिवसैनिक, आज महाराष्ट्र सैनिक आणि कायम ठाकरेंचा निष्ठावंत 'बाळा'.

पक्ष वेगळे असू शकतात, पण रक्तातला रंग एकच, मराठी. हृदयातली ज्वाळा एकच, महाराष्ट्र धर्म आणि श्रद्धेचं केंद्र एकच, माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे.

लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना साहेबांनी मला सांगितलेले शब्द आजही मला स्पष्ट आठवतात. बाळा, ह्या दोन भावांना एकत्र आण. हे एक झाले पाहिजेत. त्या क्षणी दिलेला शब्द आजही माझ्या काळजात कोरलेला आहे. मी साहेबांना म्हटलं होतं, साहेब, मी प्रयत्न करेन.

आज अभिमानाने सांगतो. नियतीने, मराठी माणसाच्या इच्छेने आणि शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीने साहेबांना दिलेला तो शब्द पूर्णत्वास गेला आहे. आज ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र उभे आहेत. ही फक्त राजकीय युती नाही, ही मराठी अस्मितेची गर्जना आहे. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरपालिका क्षेत्रात २२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या अभेद्य युतीचे मुंबई

मतदान यंत्रावर (EVM) जिथे रेल्वे इंजिन निशाणी असेल तिथे त्यासमोरील बटण दाबून युतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या.

तर तुमच्या मतदान यंत्रावर (EVM) जिथे मशाल आणि तुतारी ही निवडणूक निशाणी दिसेल तिथे युतीच्या उमेदवाराला निवडून द्या.

इतर प्रभागांतील सैनिकांनो ही तुमचीही जबाबदारी आहे.

ही लढाई मराठी माणसाच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी आहे.

चला - माननीय शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार करूया !

माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचे आणि समस्त हिंदू समाजाचे हृदयसम्राट. गर्व से कहो हम हिंदू है अशी गर्जना करणारे मा. बाळासाहेब आमचे हृदय आहेत. सन्माननीय उद्धवजी आणि राजजी हे बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत, तर निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि कडवट शिवसैनिक हा त्यांचा तिसरा नेत्र आहे. तो नेत्र उघडला की ज्वाळा निघतात, मशाल पेटते आणि ती मशाल आज इंजिनातलं इंधन पेटवून महापालिकेकडे तुतारी फुंकत सुसाट धावत आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात चमत्कार घडवू शकणारे सन्माननीय श्री. शरद पवार साहेब देखील आपल्या सोबत आहेत. थोडक्यात विकासाचं परिपूर्ण समिकरण जमलं आहे.

म्हणूनच हात जोडून विनंती करतो, मराठी माणसा जागा हो ! रात्र वैऱ्याची आहे! मुंबई आपली आहे. मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपलाच आहे. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे. मुंबई माझी आहे. मी मुंबईचा आहे.

मी मनसेचा नेता म्हणून नाही, तर तुमचा आपला बाळा म्हणून सांगतो. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, ही आपल्या अस्मितेची, आपल्या भविष्यातील मुंबईची आणि मराठी माणसाच्या हक्काची आहे. घराघरात जा, गल्लोगल्ली फिरा, माणसामाणसांत विश्वास जागवा. मत द्या मतदार घडवा आणि युतीचे उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी करा.

ही फक्त विनंती नाही. ही महाराष्ट्र धर्मासाठीची हाक आहे.

जय महाराष्ट्र !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT