Eknath Shinde Shivsena sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde news : सुप्रीम कोर्टात पहिल्याच दिवशी वकिलांची सडेतोड मांडणी; सुनावणी संपताच दिल्लीत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, पक्षांतर केलं नाही...

Eknath Shinde lawyers, Shinde faction argument, Shiv Sena disqualification case : शिवसेना काँग्रेससोबत गेलेल्या असंतोष निर्माण झाला होता, या युक्तिवादावर बोलताना शिंदे म्हणाले, खरी शिवसेना आम्हीच आहोत.

Rajanand More

Shiv Sena case update : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी बुधवारपासून बाजू मांडण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादातील अनेक मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

सुनावणी संपल्यानंतर मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपणच असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून दिल्लीतच ठाण मांडून आहे.

वकिलांच्या युक्तिवादावर बोलताना ते म्हणाले, बाळासाहेबांची घटना, विचार, ते नंतर कसे पायदळी तुडवली, हे देशाने पाहिले आहे. बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, मॅन्डेट गोठवलं आणि धनुष्यबाण गोठविण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे. त्यांनी स्वीकारलंय, आशीर्वाद दिलेत.

शिवसेना काँग्रेससोबत गेलेल्या असंतोष निर्माण झाला होता, या युक्तिवादावर बोलताना शिंदे म्हणाले, खरी शिवसेना आम्हीच आहोत. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला. आम्ही पक्षांतर केले नाही, बहुमताने शिवसेनेतच राहिलो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बदलले, त्यांनी दुसरा निर्णय घेतला.

पक्ष एकाच व्यक्तीभोवती चालत होता, असा युक्तिवादही वकिलांनी कोर्टात केला आहे. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनंतर ही परिस्थिती निर्माण झाली. निवडणुका न होता, नियुक्त्या होऊ लागल्या. मनमानी होऊ लागली. बाळासाहेब म्हणाले होते की, माझी शिवसेना कधीही विचारधारेपासून वेगळी होऊ शकत नाही. माझी काँग्रेस होऊ शकत नाही. अन्यथा मी दुकान बंद करीन. पण त्या विपरीत जे घडलं, ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे.

लोकशाही मानणारे आम्ही आहोत. बाळासाहेबांचे विचार मानणारे आम्ही आहोत. संविधान धोक्यात आहे असे गळा काढणाऱ्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. बाळासाहेबांनी पक्षात जी लोकशाही घडविली ती बुडविण्याचे काम काम त्यांनी केले. कुठल्याही निवडणुकांशिवाय हम करे सो कायदा, असे त्यांनी केले. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT