Bhaskar Jadav sarkarnama
महाराष्ट्र

Video Bhaskar Jadav : उद्धव ठाकरेंचा स्ट्राइक रेट 200, आमचा नाद नाय करायचा; भास्कर जाधवांनी ठणकावले

Shivsena Foundation Day Bhaskar Jadav : महाविकास आघाडीच्या 45 पैकी 30 जागा निवडून आल्या. तो स्ट्राईक रेट पाहा असा टोला ही शिंदे गटाला जाधव यांनी लगावला.

Roshan More

Bhaskar Jadav : आमचे 13 खासदार चोरून नेले. आमच्याकडे 5 खासदार राहिले. पाच खासदारांचे उद्धव ठाकरेंनी 9 खासदार करून दाखवले. स्ट्राईक रेटच्या बाता कोणाला मारताय. उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट 200 चा आहे. आमचा नाद नाही करायचा, असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ठणकावले.

शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात भास्कर जाधवांनी शिंदे गटाच्या स्टाईक रेटवरून करण्यात येणाऱ्या टीकेला जोरदार उत्तर दिले. महाविकास आघाडीचे 45 पैकी 30 निवडून आल्या. तो स्ट्राईक रेट पाहा असा टोला ही शिंदे गटाला जाधव यांनी लगावला.

मोदींचे फोटो लावल्यामुळे शिवसेनेचे Shiv Sena उमेदवार निवडून येतात, असे सांगत होते. आम्ही मोदींचा फोटो लावला नाही. मोदींच्या फोटोचे सांगणारी भाजपा 23 वरून 9 वर आली, असा टोला भास्कर जाधवांनी लगावला.

देशात 400 पारचा नारा देवून आम्हीच विजेते सांगत होते. आम्हीच सत्तेत येणार असे सांगून ईडी सीबीआयची भीती घालत होते. पण आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तडीपारचा नारा दिला. देशात बघा काय झाले, असे म्हणत स्वबळावर बहुमत गाठता न आलेल्या भाजपची जाधवांनी खिल्ली उठवली.

महाराष्ट्रातील 48 पैकी 48 मतदारसंघात उद्धव ठाकरे प्रचाराला गेले. 45 पारचा नारा देणाऱ्या भाजप BJP महायुतीला किती यश मिळाले. उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले.

आता भविष्यात कोणाला छोटा करण्यासाठी आपले पैसे आणि वेळ घालवण्यापेक्षा आपण संकल्प केला पाहिजे की आपला पक्ष मोठा कसा होईल कोणाला छोटं करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठे कस करता येईल हा संकल्प केला पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले.

...तर स्ट्राईक रेट दाखवला असता

अमोल किर्तीकर यांचे 48 मतांनी पराभव झालाय. हातकणंगलेमध्ये आमचा उमेदवार कमी मतांनी पराभव झालाय.नाहीतर यांना स्ट्राईक रेट दाखवला असता, असे देखील जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT