Water Supply Minister Gulabrao Patil Vs BJP  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Vs BJP: 'मी भोळा राहिलो, तर भाजपवाले मला खाऊन जातील...”; एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्यानं महायुतीत उडवून दिली खळबळ

Mahayuti Government News: राज्यात सत्तेच्या सारीपाटात जरी एकत्र नांदत असले तरी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्य़ा भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार कलगीतुरा रंगल्याचं अनेकदा दिसून येतं. या दोन्ही पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही.

Deepak Kulkarni

Jalgaon News: राज्यात सत्तेच्या सारीपाटात जरी एकत्र नांदत असले तरी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्य़ा भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार कलगीतुरा रंगल्याचं अनेकदा दिसून येतं. या दोन्ही पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही. वेगवेगळ्या कारणांवरुन सातत्यानं दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे एकमेकांसोबत खटके उडाल्याचं दिसून आलं आहे. युतीधर्म जपल्याचं सांगतानाच एकमेकांवर कुरघोडी राजकारण करण्याची दोन्ही बाजूचे नेते एकही संधी सोडत नाही. अशातच आता शिवसेनेच्या मंत्र्यानं थेट महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपलाच डिवचलं आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखठोक भूमिकांसाठी कायम चर्चेत असतात. विधानपरिषद निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान भाजपविरोधात बऱ्याचदा शड्डू ठोकणारे गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा आपलं पोटातलं ओठांवर आणल्याची चर्चा जोरदारपणे खान्देशच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे एका कार्यक्रमात तुफानी भाषण केलं. या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत स्टेजवर भाजप आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच पाटलांनी आपल्या जिभेवरचा संयम गमावल्याचं दिसून आलं.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोरच गुलाबराव पाटील यांनी जर मी भोळा राहिलो, तर मला भाजपवाले खाऊन जातील, असं विधान करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. आपल्या वक्तव्यावरुन मित्रपक्ष भाजप दुखावला जाणार याची शक्यता लक्षात घेत लगेच त्यांनी सारवासारवही केली.

ते म्हणाले, माझ्या तोंडातून काहीही निघतं आणि बोललं जातं. मग हे टीव्हीवाले काही पण दाखवतात. त्यामुळे मी आता सांभाळून बोलतो, असा चिमटाही त्यांनी काढला. पण त्याआधीच गुलाबराव पाटलांनी माध्यमांमध्ये आपल्या भाषणाची कशी जोरदार चर्चा होईल याची पुरेपूर काळजी घेतली होती.

पाटील यांनी खिंड लढवली. जे. टी. महाजन उच्चशिक्षित होते. ते अत्यंत साधे होते आणि त्यांची नाळ शेतीची जुळलेली होती. त्यामुळे त्यांनी साखर कारखाना, सहकारी संस्था यांचे जाळे विणले. जिल्हा दूध संघाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आपल्याकडे आहेत. दूध संघ चांगले चालवा, कार्यक्रम केला. तर कार्यक्रम होईल (आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून) त्यांनी जोरदार टोला लगावला.

गुलाबराव पाटील यांनी यावेळी आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे जे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवायांनी चर्चेत आले आहेत,त्यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले, मुंढेंसारखे अधिकारी आले आणि आपल्या दुधसंघात येणारं दूधही वाढलं. तसेच भेसळयुक्त पनीर आता कुठेच मिळत नसल्याचं सांगत मुंढेंच्या कर्तव्यदक्ष कामाची पोचपावतीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT