Vijay Shivtare, Uday Samant
Vijay Shivtare, Uday Samant  Sarkarnama
महाराष्ट्र

Uday Samant: शिवतारे प्रकरण हे मला न झेपणारी गोष्ट; उदय सामंत असे का म्हणाले...

सरकारनामा ब्यूरों

Political News: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Constituency) लढण्यावर शिवतारे ठाम आहेत.

बारामती जागेच्या वादावरून शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शिवतारे प्रकरणावर भाष्य केले आहे. मला ही न झेपणारी गोष्ट असल्याचे उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या या प्रतिक्रियेमुळे शिवतारे यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या नेत्यांनी किती गांभीर्याने घेतले आहे, हे स्पष्ट होते.

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल. मला माहिती नाही. पण, मी बारामतीतून अपक्ष उभा राहणार आहे. नरेंद्र मोदी विचार मंच लिहिणार किंवा काही लिहिलं, पण मी महायुतीच्या विरोधात नाही, आमच्या नेत्यांच्या विरोधात नाही.

आमचा विरोध फक्त पवारांना आहे. त्या विरोधासाठी लोकांना संधी तर मिळायला पाहिजे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गाड्या फिरत आहेत, पण दुसऱ्या बाजूचा विचारच होत नाही. ही पोकळी भरून काढण्याचे काम मी करणार आहे, असेही शिवतारे यांनी दोन दिवसांपूर्वी नमूद केले आहे.

"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला अपमान केला आहे. सहा सहा पक्ष एकत्र करून कटकारस्थानं केली आहेत. अजित पवार हे अशा प्रकारे पुरंदरच्या जनतेशी वागले आहेत. आम्ही त्यांना मतदान कसे करणार. महायुती असो की काही असो.

त्यामुळे अजित पवार यांना मतदान न करण्याच्या मानसिकतेत अनेक लोकं आहेत. अजित पवार यांनी नालायकपणाचा कळस गाठला होता. पण, नियती त्यांना धडा शिकवेल," असे शिवतारे यांनी म्हटलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT