Madha Loksabha Constituency : निंबाळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी की सर्वसहमती?; पवारांच्या निर्णयाकडे माढ्याचे लक्ष...

Mahavikas Aghadi News : अकलूजचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे यांचा विरोध झुगारून देत भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. मात्र, महायुतीमधील या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांची समजूत भाजप कशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil-Aniket Deshmukh-Dhairsheel Mohite Patil
Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil-Aniket Deshmukh-Dhairsheel Mohite PatilSarkarnama

Solapur News : भारतीय जनता पक्षासाठी कळीचा ठरलेल्या माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मोहिते पाटील आणि आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नाराजीचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. भाजपने निंबाळकरांना माढ्याच्या रणांगणांत उतरविल्याने आता महाविकास आघाडी विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, माढ्यासाठी पवारांचे डावपेच काय असणार, मोहिते पाटील सर्वसहमतीचा डाव टाकणार का, याची प्रचंड चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

अकलूजचे मोहिते पाटील (Mohite Patil) आणि फलटणचे रामराजे (Ramraje) यांचा विरोध झुगारून देत भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. मात्र, महायुतीमधील या दोन महत्त्वपूर्ण नेत्याची समजूत भाजप कशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. माढा मतदारसंघात (Madha Constituency) सर्व आमदार महायुतीचे आहेत. मात्र, फलटणचे आमदार वगळता सर्वांचा पाठिंबा मिळविण्यात रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Sinh Naik Nimbalkar) यांना यश आले आहे. पण, मतदारसंघातील सामाजिक समीकरणेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil-Aniket Deshmukh-Dhairsheel Mohite Patil
Madha Lok Sabha Constituency : निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच माढ्यात महायुतीला पहिला धक्का; संपर्क प्रमुखांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

माढ्यातून मागील निवडणुकीत एकट्या मोहिते पाटलांनी माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य दिले होते. मतदारसंघातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, फलटण, माण खटाव या विधानसभा मतदारसंघांपैकी सांगोला, करमाळा, फलटण आणि माण खटावमध्येही विरोधकांची ताकद सत्ताधारी खासदाराच्या तोडीची आहे. माळशिरसमध्ये मोहिते पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आमदारांनी जरी निंबाळकरांना समर्थन दिले असले तरी अंतर्गत विरोधही तेवढाच आहे. मोहिते पाटलांना डावलून भाजपने माढ्यात जोखीम पत्करली आहे का, याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे. पवारांनी महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला आहे. दुसरीकडे आपले 50 वर्षांचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना अद्यापही दुखावले नाही. मोहिते पाटलांचे खरे दुखणे अजित पवार होते आणि आता ते बाजूला गेले आहेत. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत. त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन विजयदादांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil-Aniket Deshmukh-Dhairsheel Mohite Patil
Praniti Shinde News : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रणिती शिंदेंचे सडेतोड उत्तर; ‘माझ्या रक्तातच काँग्रेस; ती केवळ अफवा’

मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून आता ‘वाजवा तुतारी’चा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे. त्यामुळे पवार हे मोहिते पाटील यांना बळ देतात की, मोहिते पाटील यांच्याकडून सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव पुढे करतात, हे पाहावे लागेल. स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी देशमुख यांच्यासारखा नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपले ईप्सित साध्य करतात, हे पाहावे लागेल.

महाविकास आघाडीकडून महादेव जानकर आणि डॉ. अनिकेत देशमुख हे दोघे निंबाळकर यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात. मतदारसंघातील सामाजिक समीकरण त्यासाठी पोषक आहे. शिवाय पवारांविषयी सहानुभूतीही या मतदारसंघात असल्याचे दिसून येते, त्यामुळे पवारांच्या माढ्यातील राजकीय डावपेचाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

R

Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil-Aniket Deshmukh-Dhairsheel Mohite Patil
Loksabha Election 2024 : डॉ. सुभाष भामरेंना प्रबळ इच्छुकांच्या नाराजीचा फटका बसणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com