Siddharth Jadhav with Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray at Toll Plaza : टोलनाक्यावर राज ठाकरेंचा रुद्र अवतार पाहून सिद्धार्थ जाधव यांनी ठोकला 'सॅल्युट' अन् म्हणाले...

Siddharth Jadhav with Raj Thackeray : मराठी अभिनेते सिध्दार्थ जाधव राज ठाकरे यांच्या गाडीत त्यांच्या सोबत प्रवास करत होते.

Mayur Ratnaparkhe

सचिन देशपांडे-

Raj Thackeray News : टोलनाक्यांवर असलेली चार ते पाच किलोमीटर वाहनांची रांग आणि त्यात अडकलेली अ‍ॅम्बुलन्स पाहुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी थेट खालापूर टोलनाक्यावर स्वतः रस्ता क्लिअर केल्याचे अनेकांनी पाहिले. या घटनेचा व्हिडीओही टेलिव्हिजनवर आल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली.

या प्रवासात मराठी अभिनेते सिध्दार्थ जाधव राज ठाकरे यांच्या गाडीत त्यांच्या सोबत प्रवास करत होते. त्यांनी राज ठाकरे यांचा रुद्रावतार पाहत लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे नेते असा उल्लेख करत, एक्सप्रेस वे क्लिअर करण्यात आज राज ठाकरे यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले. त्याच बरोबर सिनेमात हिरो असतात पण, राज ठाकरे हे खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचे मत सिध्दार्थ जाधव यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाट्य संमेलनात उपस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) हे स्वतः गाडी चालवत पुणे येथून मुंबई कडे निघाले. पण, एक्सप्रेस वे वर लांबच लांब गाड्याची रांग आणि त्याच बरोबर त्या मधात फसलेली अ‍ॅम्बुलन्स पाहून राज ठाकरे यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट खालापूर टोलनाक्यावर गाडीतून खाली उतरत टोल नाक्यांच्या कर्मचाऱ्यांना अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये झापले.

टोल नाक्याचे कर्मचारी चांगलेच भेदरले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर सर्व गाड्या जाऊ दिल्यात. यात अडकलेली अ‍ॅम्बुलन्स पण तत्काळ निघाली. त्यानंतर लांब रांग कमी झाल्यावर राज ठाकरे पुढच्या प्रवासाला निघाले. त्या पुढील टोल नाक्यावर देखील राज ठाकरे यांनी थेट कर्मचाऱ्यांना झापून मार्ग क्लिअर केला.

वाशी टोल नाका येथे देखील राज ठाकरे यांनी स्वतः थांबून मार्गातील गाड्यांचा मार्ग मोकळा करण्याचे आदेश टोल नाका कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी राज ठाकरे यांच्या गाडीत सोबत सिध्दार्थ जाधव होते. त्यांनी हा सर्व प्रसंग अंगावर काटा आणणारा असल्याचे सांगत राज ठाकरे हे खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचे म्हणत सॅल्युट ठोकला.

कलाकारांविषयी राज ठाकरे यांचे प्रेम सर्वश्रृत आहे. असे म्हणत सिध्दार्थ जाधव यांनी कृतीतून राज ठाकरे यांनी आज मन जिंकल्याचे सांगितले. तर लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता अशी राज ठाकरे यांची ओळख अधोरेखित झाल्याचेही म्हटले . सिनेमात हिरो असतात पण, राज ठाकरे हे खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचे सांगत सिध्दार्थ जाधव यांनी राज ठाकरे यांचा टोलनाक्यावरील रुद्रावतार पाहिल्यानंतर रिल आणि रिअल यातील फरक सांगितला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT