Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेल्या 100 व्या नाट्यसंमेलनात राज ठाकरे यांची मुलखात झाली. या मुलाखतीमध्ये चौफेर फटकेबाजी करताना राज ठाकरे यांनी कलावंतांनी कसं वागायला हवं, हे सांगताना शरद पवार यांच्या विषयी महत्वाचे विधाने केले.
मराठी कलाकार जेव्हा सार्वजनिकरित्या एकमेकांना भेटतात. तेव्हा एकमेकांच्या शाॅर्ट नावाने आवाज देतात. ते एकमेकांना सार्वजनिकपणे मान देताना दिसत नाहीत. मात्र, दक्षिणात्य कलाकार एकमेकांचे किती जवळचे मित्र असले तरी सार्वजनिकपणे एकमेकांचा सर म्हणूनच उल्लेख करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझे आजोबा जे म्हणायचे तेच माझे काका म्हणत होते. मी पण तेच म्हणतोय. किती दिवस पाणी देणार, रस्ते देणार असे आपण लोकांना सांगणार.खरंच मला निवडणुक लढताना लाज वाटते, असे राज ठाकरे यांनी सांगत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. 70 वर्षात प्राथमिक गरजा आपण पूर्ण करू शकल नाही. जर कलावतं नसते.नाटकार, चित्रकार, नसते.तर, देशात अराजकता असता, अशी भीती देखी राज यांनी बोलून दाखवली
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.