aryan khan shahrukh khan
aryan khan shahrukh khan sarkarnama
महाराष्ट्र

धक्कादायक : शाहरुखचीच इच्छा, 'मुलानं ड्रग्स घ्यावेत'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही इच्छा यापूर्वी शाहरुखनेच बोलून दाखवली होती. यावरून आता अभिनेता शाहरुख खानला (shahrukh khan) ट्रोल केले जात आहे. शाहरुख खानने आपला मुलगा आर्यनबद्दल एका मुलाखतीत असे काही सांगितले होते की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. ''आर्यनला सर्व चुकीच्या गोष्टी करु शकतो ज्या मी तरुणपणात करू शकल्या नाहीत,'' असं शाहरुखने म्हटले होते. आपल्या वडीलांचे स्वप्न आर्यनं (aryan khan) पूर्ण केल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे.

गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात 'किंग खान' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. आर्यन खान सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर किंग खानचे च्या त्या मुलाखतीचे जुने व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. सिमी ग्रेवालच्या टॉक शोमधील (Simi Grewal talk show) शाहरुख खानने केलेली ही वक्तव्ये आता या प्रकरणामुळे पुन्हा व्हायरल होत आहेत.

या टॉक शोमध्ये शाहरुखसह गौरीही दिसली होती. गौरीने तिचा पहिला मुलगा आर्यनला जन्म दिल्यानंतर खास सिमीने शाहरुख आणि गौरी यांच्याशी मुलाबद्दलही चर्चा केली होती. तेव्हा शाहरुख म्हणाला होता की, मला तरुण वयात ज्या चुकीच्या, अनैतिक गोष्टी करता आल्या नाहीत त्या सर्व माझ्या मुलाने जरुर कराव्यात. शाहरुखचे हे उत्तर अनेकांसाठी अनपेक्षित होते.

शाहरुख पुढे म्हणाला की, सोयी सुविधा नसल्यामुळे ज्या गोष्टी तरुपणात मला करता आल्या नाहीत. त्या सगळ्या माझ्या मुलाने कराव्यात अशी माझी इच्छा आहे. तो ३ ते ४ वर्षांचा झाल्यावरच आर्यनला काही गोष्टी करण्याची परवानगी असेल. त्याने खुशाल मुलींच्या मागे फिरावं, ड्रग्स घ्यावेत आणि सेक्ससुद्धा करावा, मला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या आर्यनने लवकर सुरु केल्या तर उत्तम.

दरम्यान, आर्यन खानने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. पार्टीसाठी माझ्याकडून कोणतीही फी घेतली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’, असल्याचा खुलासा केला आहे. एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT