आर्यन खानसाठी सुनील शेट्टी मैदानात..नेटकरी म्हणतात, “उडत्या बॉलिवूड”वर गप्प का?”

अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) शाहरुखच्या (shahrukh khan) मुलाच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत, अशी टीकाही समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे.
Sunil Shetty,  aryan khan
Sunil Shetty, aryan khansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात 'किंग खान' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने (NCB) ताब्यात घेताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. आर्यन खानसह (aryan khan) १० आरोपींना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच शिपची ओपनिंग झाली होती. यावेळी मोठी पार्टी करण्यात आली त्या पार्टीला अनेक सेलिब्रेटींनी परफॉर्मन्स केला होता.

अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) शाहरुखच्या (shahrukh khan) मुलाच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत, अशी टीकाही समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. याच बॉलिवुडने पंजाबची “उडता पंजाब” म्हणून बदनामी केली. आज तेच बॉलिवूड “उडते बॉलिवूड” झाले आहे. त्याच्यावर मात्र अनेक जण शहामृगा सारखी वाळूत तोंडे खुपसून बसले आहेत, असेही नेटिझन्सनी एकापाठोपाठ एक तडाखे लगावले आहेत.

Sunil Shetty,  aryan khan
सोमय्यांचा गैाप्यस्फोट ; भष्ट्राचारी 'ठाकरे सरकार इलेव्हन''ची यादी वाढणार

''त्या मुलांनी ड्रग्स घेतले असेच गृहीत धरून चालतो. याचा तपास होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या,'' असे सहानुभूतीचे उदगार सुनील शेट्टीने काढले. यावरूनच तो आर्यन खानच्या समर्थनाला बाहेर आल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच नेटिझन्सनी “उडता पंजाब” वरून “उडत्या बॉलिवूडकडे आपल्या तोफा वळविल्या आहेत.

आर्यन खान सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू असून दरम्यान त्याने ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, आर्यन खानने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. पार्टीसाठी माझ्याकडून कोणतीही फी घेतली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’, असल्याचा खुलासा केला आहे. एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com