Maharashtra Tehsildar Strike sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Tehsildar Strike : ...म्हणून राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर

Strike News : राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांनी 14 ते 21 मार्च 2023 या कालावधीत संप पुकारला होता. हा संप मिटतो न मिटतो तोच आता राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार हे आजपासून (3 एप्रिल) बेमुदत संपावर गेले आहेत.

राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार( यांनी बेमुदत कामबंद आंदोलन (Strike) पुकारलं आहे. राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड पे (Grad Pay) मुद्यावरुन हा बेमुदत संपाचं शस्त्र उपसलं आहे. मात्र, या संपामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका मात्र, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे.

संपामागचं कारण काय?

राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार(Naib Tehsildar) या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागातील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.

...म्हणून ग्रेड पे वाढवून द्यावा!

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार (Tehsildar)संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र, वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत.

..तर सरकारी तिजोरीवर प्रतिवर्ष एवढ्या कोटींचा बोजा वाढणार!

महाराष्ट्र राज्य तहसीलदार(Tehsildar) व नायब तहसीलदार संघटनेची वाढीव ग्रेड पेची मागणी सरकारकडून मान्य झाल्यास राज्यातील 2200 पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना फायदा होणार आहे. मात्र,दुसरीकडे सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT