Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांचं सूचक विधान; ''...तर शिंदेंसोबत गेलेल्यांना परत आणणार!''

Maharashtra Politics: जे काही शिंदे गटात गेले आहे ते तिकडे का गेले ? कारण...

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Political News : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. कसब्यातील विजयानंतर महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी आपला करिष्मा दाखविण्यास तयार आहे. याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार यांनी 'साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी केलेल्या विधामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आगामी काळात जे लोक शिंदेंसोबत वा भाजपसोबत गेले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचं मोठे संकेत खुद्द अजित पवारांनी (Ajit Pawar) दिले आहेत.

अजित पवार म्हणाले, जूनमध्ये गेलेलं सरकार पुन्हा आणण्यासाठी काय आखणी केली पाहिजे, मताची विभागणी कशी रोखायची, याचा विचार आणि प्रयत्न करत आहोत. आपण आता त्या गटाकडून निवडून येऊ शकत नाही आणि महाविकास आघाडी पुन्हा येईल अशी परिस्थिती झाली की, गेलेले अनेकजण परत येतील. आम्ही सगळ्यांचा विचार करणार नाहीत. पण इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्यांचा विचार नक्की करू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

जे काही शिंदे गटात गेले आहे ते तिकडे का गेले ? कारण त्यांनी भीती वाटली, आता नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे. आणि ते निवडून येऊ शकत आहे. पण याआधी देशात अनेक नेत्यांचा करिष्मा होता. कधीकाळी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहून मतदान झालेलं आपण पाहिलं आहे. तसेच शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून मतदान झालं असंही पवार यांनी नमूद केलं.पानटपरी चालविणारे, ड्रायव्हिंग करणारे अनेकजण आमदार, खासदार झाले आहेत असंही पवार यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT