Chandrakant Patil: खचून जाऊ नका...; कसब्याच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांनी मतदार संघात ठाण मांडूनही कसब्यात भाजपचा पराभव झाला
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Chandrakant Patil booster dose to the workers : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना दिला आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय खेचून आणला. विसाव्या फेरीअखेर ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा धक्कादायक पराभव केला. या मुळे बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीने भाजपला धुळ चारली अशी चर्चा आहे.

खरंतर भाजपने ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली होती. भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांनी मतदार संघात ठाण मांडले होते. पण भाजपचा पराभव झाला. या पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी बूस्टर डोस दिला आहे.

Chandrakant Patil
Ravindra Dhangekar Victory: भाजपनं कसबा गड गमावला; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय

चंद्रकांत पाटील यांनी काल कसबा पोटनिवडणुकीत भाजप चे उमेदवार राहिलेले हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी भाजप चे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थितीत होते. कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून जाऊ नका. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा. नव्या जोमाने आणि तागदीने कामाला लागा, असा सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येऊन कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत चमत्कार दाखवला. तीन दशकांपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राहिलेला कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी खेचून आणला. या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचारात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. त्यामुळे तेथे कोणीच कमी पडले नाही. पण प्रयत्नांची शिकस्त करूनही हक्काच्या मतदारांनी का पाठ फिरवली याचा विचार भाजपच्या नेत्यांना आता तटस्थपणे करावा लागणार आहे.

कसब्याच्या निकालाने भाजपचे अनेक आडाखे चुकले असून यातून महाविकास आघाडीच्या एकत्रित येण्याला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या दृष्टीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासारखा तुल्यबळ कार्यकर्ता असलेला आमदार पक्षाला मिळाला असून पक्षाच्या पुनरुज्जीवनाला त्याचा लाभ होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com