High Court Orders FIR Against Police in Somnath Suryavanshi Death Case : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात बुधवारी राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात सरकारने केलेले अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले आहे. तसेच हायकोर्टाचा निकालही कायम ठेवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत माहिती दिली. ते स्वत: ही केस लढत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आहे. सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आंबेडकर यांच्याकडून त्यांची बाजू मांडली जात आहे.
काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळून लावत हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे सोमनाथ यांचे कुटुंबीय आणि प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे.
याविषयी मीडियाशी बोलताना आंबेडकरांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. राज्याचे अपील फेटाळून लावले आहे. हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच कोम्बिंग ऑपरेशनची नोंद कोर्टाने घेतली आहे. आता एसआयटी की तपास अधिकाऱ्यांमार्फत तपास करायचा याचा निर्णय सरकार घेईल. जेजेच्या संबंधित डॉक्टरांनाही आरोपी करण्यासाठी अर्ज करणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर माहिती दिली होती. जेजे रुग्णालयाच्या अहवालामध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनसंस्थेच्या गंभीर आराजामुळे झाल्याचे म्हटले आहे. मात्र, याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.