
ED News : 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून 'ईडी'चा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ईडीबाबात सु्प्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी देखील राजकीय वापर होत असल्याचे सुनावले होते. 2014 नंतर आत्तापर्यंत गेल्या साडेदहा वर्षात ईडीच्या किती केसेसमधे तपास पूर्णत्वास नेऊन दोषी ठरले आहे, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्याला गृहमंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे.
गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार गेल्या साडेदहा वर्षात 5 हजार 892 केस झाल्या झाल्या आहेत. त्यापैकी 49 केसमध्ये क्लोजर रिपोर्ट दिला आहे. तर, अवघ्या आठ केसमध्ये तपास पूर्णत्वास नेऊन दोषी ठरवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
ईडीकडून दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टची संख्या अवघी 49 असल्याने हे प्रमाण 1 टक्के देखील नसल्याचे टीका करण्यात येत आहे. विरोधकांना संपवण्यासाठी केवळ ईडीचा वापर केला जातो आहे. त्याद्वारे पक्ष फोडले जात आहे नेते भाजपकडे वळवले जात आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना पवित्र करून घेत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि त्यांच्या पत्नीला एका प्रकरणात दोषमुक्त करताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी ईडीला खडेबोल सुनावले होते. आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका नाहीत आम्हाला ईडी विषयी कठोर टिपण्णी करावी लागले, असे सरन्यायाधीश म्हणाले होते,दुर्देवाने मला महाराष्ट्रात अनुभव आहे. मतदारांना राजकीय लढाई लढू द्या, असे देखील सरन्यायाधीश म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.