Sushilkumar Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Sonia Gandhi memoir : सोनिया गांधींच्या आत्मचरित्राने राजकीय वर्तुळात खळबळ; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितली राजीव गांधींच्या आठवणींची गोष्ट!

Sushilkumar Shinde reacts to Sonia Gandhi's memoir Belonging: A Journey of Love, recalling Rajiv Gandhi's UN speech and Sonia's leadership after his death : संयुक्त राष्ट्रांच्या सभेत राजीव गांधींच्या भाषणाला संपूर्ण सभागृह उभे राहून दिली होती दाद; राजीव गांधींच्या निधनानंतर सोनिया गांधींनी काँग्रेसची जबाबदारी कशी सांभाळली, याचाही शिंदेंनी केला उलगडा.

Pradeep Pendhare

Sushilkumar Shinde recalls Rajiv and Sonia Gandhi first meeting : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर आज देशभरात त्याचीच चर्चा आहे. राजकीय क्षेत्रात सर्वाधिक पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातून देखील पुस्तकावर प्रतिक्रिया येत समोर येत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, पुस्तकाच्या निमित्ताने, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पहिली भेट, राजीव गांधींचे वर्णद्वेषाविरोधातील भाषण अन् संपूर्ण सभागृहाने उभे राहून केलेले टाळ्यातून केलेले स्वागत, याची आठवण सांगितली.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या आत्मचरित्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सध्या माझ्याकडे हे पुस्तक नाही. मात्र, मी सोनिया गांधी यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले असल्याने त्यांनी या पुस्तकात काय लिहिले असेल आणि कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला असेल, याची मला काहीशी कल्पना येते.

1985 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सभेत मी पहिल्यांदा राजीव गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाहिले होते. त्यावेळी राजीव गांधी वर्णद्वेषाच्या विरोधात भाषण केले होते. त्यांच्या भाषणाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण सभागृह उभे राहिले होते. त्यावेळी मला पहिल्यांदा दोघांचे नाते जवळून पाहायला मिळाले, अशी आठवण सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितली.

मी अनेक वर्षे महाराष्ट्रात होतो. काँग्रेससाठी काम करत होतो. मात्र, दरवर्षी राजीव गांधी यांचा वाढदिवस आला की, मी त्यांना भेटण्यासाठी जात असे, असे सांगून राजीव गांधी यांचे निधनानंतरच्या काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले. 1990च्या दशकात मी दिल्लीला आलो. कठीण परिस्थितीतही सोनिया गांधी लोकांना भेटताना अतिशय शांतपणे आणि संयमाने समोरे जात होत्या. लोकांच्या मांडलेल्या मुद्यांना, सूचनांना प्रतिसाद देत होत्या. विशेषतः राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

या सर्व परिस्थितीत सोनिया गांधी समर्थपणे उभ्या राहिल्या. काँग्रेस पक्ष आणि पक्षातील नेत्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही पार पाडली. काँग्रेस खासदारांना नेतृत्व दिले. आजही लोकसभेत काँग्रेसचे 99 खासदार आहेत. त्यात राज्यसभेतील खासदारांची संख्या जोडली, तर हा आकडा 100च्या पुढे जातो. आजही त्या खासदारांना नेतृत्व देत आहेत, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT