Representative image of SSC-HSC answer sheets as Maharashtra Board considers using AI technology for evaluation and faster result processing. Sarkarnama
महाराष्ट्र

SSC-HSCची मोठी क्रांती! उत्तरपत्रिका तपासणीत AIचा वापर? बोर्डाने सरकारला पाठवला खास प्रस्ताव

Maharashtra board AI answer sheet checking : SSC आणि HSC उत्तरपत्रिका तपासणीसाठी AI तंत्रज्ञान वापरण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र बोर्डाने सरकारकडे पाठवला आहे. निकाल प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.

Rashmi Mane

SSC आणि HSC परीक्षांच्या निकाल प्रक्रियेत मोठा बदल घडवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. येत्या 2026 पासून 10 वी आणि 12 वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऑनलाइन मूल्यांकन प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. सध्या हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

दरवर्षी राज्यभरातील सुमारे 15,000 केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका वेगवेगळ्या ठिकाणी जमा करून शिक्षकांमध्ये वाटल्या जातात. त्यानंतर ऑडरेटर आणि मुख्य मॉडरेटर तपासणीची पुन्हा पडताळणी करतात. या संपूर्ण प्रक्रियेत वेळ, मनुष्यबळ, वाहतूक आणि खर्च मोठ्या प्रमाणात लागतो. त्याचबरोबर मानवी चुका होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

नवीन प्रस्तावानुसार उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल स्वरूपात साठवल्या जातील. त्यानंतर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणांकन प्रक्रिया केली जाईल. यामुळे प्रश्न तपासायचा राहून जाणे, गुणांची बेरीज चुकणे किंवा अन्य त्रुटी कमी होतील. निकाल प्रक्रियेला गती मिळेल आणि विद्यार्थ्यांना कमी वेळेत निकाल जाहीर करता येईल.

परीक्षा मूल्यांकन अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा विचार सुरू आहे. सुरुवातीला ही पद्धत मर्यादित स्तरावर प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल. पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास पुढील टप्प्यात ती राज्यभर लागू करण्याचा विचार होऊ शकतो.

दरम्यान, या बदलासोबत काही आव्हानेही आहेत. ग्रामीण भागात आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे, मोठ्या प्रमाणावर स्कॅनिंग व्यवस्था उभी करणे आणि शिक्षकांना नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देणे ही मोठी जबाबदारी असेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्रातील परीक्षा पद्धतीत हा एक महत्त्वपूर्ण आणि अधिक हाय-टेक आणि विश्वासार्ह होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT