Thane Traffic Police News Sarkarnama
महाराष्ट्र

SSC-HSC Exam News: दहावी- 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत पोहचण्यासाठी मिळणार पोलिसकाकांची मदत

Thane Traffic Police News:ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

SSC-HSC Exam News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक (१० वी) आणि उच्च माध्यमिक (१२ वी) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी पासुन सुरू होत आहेत, यासाठी राज्य परीक्षा बोर्डांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रात पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिसही सज्य झाले आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटांतच पोलिसकाकांची मदत मिळणार आहे.

ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी यासाठी विशेष नियोजन केले आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत मिळणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर यासाठी 54 रायडर्स सज्ज आहेत. ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी यासंदर्भात माहिती दिली. अशाच प्रकारचे नियोजन राज्यातील अन्य पोलीस आयुक्तांनी करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात पोहोचण्यात रस्त्यावर अडचणी आल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन शिरसाट यांनी केले आहे.

ही सुविधा परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच, नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळात 12 वी ची एकूण 126 केंद्रे तर इयत्ता 10 वी ची एकूण 223 केंद्रे आहेत.

  • विद्यार्थ्यांना अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400

  • ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक 7039003866 आणि 18 वाहतूक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी,आयएसडी,बुथ, फॅक्स केंद्रे,झेरॉक्स सेंटर्स,ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप,मोबाईल,प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

परीक्षाकेंद्राच्या परिसरात व त्यासभोवतालच्या 100 मीटर परिसरात इतर कोणत्याही व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राचे परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करीत आहे. या केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना आदेशातून सूट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT