anil parab, sharad pawar
anil parab, sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

STसंप मिटवण्यासाठी पवार-परब यांच्यात निर्णायक चर्चा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या (st strike) पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी परब यांनी त्यांच्याशी दहा मिनिटे संपावर चर्चा केली. समन्वयाने सुवर्णमध्य काढत एसटी संप कसा मिटवता येईल, या संदर्भात चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

संप मिटवण्यासाठी पवार-परब यांच्यात निर्णायक चर्चा झाल्याचे समजते. संप मिटवण्यासाठी शरद पवार (sharad pawar) यांनी अनिल परब (anil parab) यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन विभाग आज तयार करणार आहे. प्रस्ताव आजच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाणार आहे.शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. काही विद्यार्थी परिक्षा देता आल्या नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी १७ आगारांमधून ३६ बसगाड्या सोडण्यात आल्या व त्यातून ८२६ प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला आहे. दुसराकडे आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते.

'राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा,' या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर २६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादानंतर संप सुरु आहे. आज संपाचा सहावा दिवस आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात बुधवारपासून ठिय्या मांडला आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे सहभागी झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूण १७ संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

संपामुळे ऐन दिवाळीच्या दिवसात सामान्य प्रवाशांचे हाल झाले. हा संप कधी संपणार, एसटी कधी रुळावर येणार, याचं उत्तर आज कुणाकडे नाही. संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनावर कारवाई होत आहे. आतापर्यत 2 हजार 53 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT