कंगनाच्या विरोधात कॉग्रेस आक्रमक ; देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

कंगना राणावत विरोधात (Kangana Ranaut) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान (Congress Arif Naseem Khan) यांनी केली आहे.
Kangana Ranaut, Arif Naseem Khan
Kangana Ranaut, Arif Naseem Khansarkarnama

मुंबई : ''भारताला 1947 मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे बेताल वक्तव्य करुन अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) हिने लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगनाचे विधान हा देशद्रोहच आहे. त्यामुळे कंगना राणावत विरोधात (Kangana Ranaut) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान (Congress Naseem Khan) यांनी केली आहे.

खान यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अभिनेत्री कंगना रणावतसारख्या अविचारी व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देणे हा पुरस्काराचाही अपमानच आहे. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा अशी मागणी खान यांनी केली आहे. त्यांच्यासोबत उत्तर मध्य मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगदीश आमीन, मो. शरिफ खान, प्रभाकर जावकर, माया खोत आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

Kangana Ranaut, Arif Naseem Khan
आमदार अशोक पवार संतापले ; रुबी हॉलच्या चौकशीचे आदेश

खान म्हणाले, ''भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोठा संघर्षपूर्ण व प्रदिर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटिशांच्या जुलमी, अत्याचारी राजवटीला भारतातून हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, शहिद भगतसिंग यांच्यासारख्या अनेकांचे योगदान या स्वातंत्र्य लढ्यात होते. ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ म्हणत शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या खाल्या, आपले प्राण दिले. या सर्वांच्या त्यागामुळे आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.''

कंगना राणावतच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी कंगनावर (Kangana Ranaut) हल्लाबोल करुन नाराजी व्यक्त केली होती. वरुण गांधींना कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना आपल्या विधानावर ठाम आहे. 'जा आणि रडत बस'अशी खिल्ली कंगनाने वरुण गांधीची उडवली आहे. कंगनाने वरुण गांधी यांना इन्स्टाग्रामवर उत्तर दिले आहे, कारण तिचं ट्विटर अकाऊंटवर बंदी आहे.

कंगना म्हणाली, मी १८५७ सालच्या देशाच्या पहील्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख केला होता. जो अयशस्वी झाला. त्यावेळी आपल्याला ब्रिटीशांची क्रूरता आणि अत्याचार सहन करावे लागले होते. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनंतर गांधीनी भिक मागितल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जा आणि रडत बस असेही तिने वरुण गांधींना म्हटले आहे. तिनं वरुण गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

कंगणावर निशाणा साधत काल वरुण गांधी म्हणाले होते की, कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह ,चंद्रशेखर आजाद, नेताची सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांचा तिरस्कार. या विचारसरणीला वेड म्हणायचं की देशद्रोह ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com