commits suicide by hanging himself
commits suicide by hanging himself Sarkaranama
महाराष्ट्र

संपामुळे नोटीस, एसटी कर्मचाऱ्याने दिवाळीदिवशीच घेतला गळफास

सरकारनामा ब्युरो

जालना : जालन्यातील अंबड बस आगारात चालक कम वाहक म्हणून काम करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने दिवाळी दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाटा चनकवाडी या ठिकाणी काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. शंकर झिने असे आत्महत्या केलेल्या २६ वर्षीय एस टी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

२०१९ मध्ये शंकर झिने एसटी सेवेत दाखल झाले होते. मात्र २०२० पासून त्यांनी प्रत्यक्ष सेवा द्यायला सुरुवात केली होती. सध्या आपल्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात झिने हे देखील सहभागी झाले होते. पण याच संपात सहभागी झाल्यामुळे महामंडळ प्रशासनाने त्यांच्या विरुद्ध सेवा समाप्ती नोटीस बजावली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते नैर्याशातून आणि आर्थिक विवंचनेतुनच त्यांच्या गावी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. झिने यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

संप मागे घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश :

एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत केलेल्या चर्चेअंती २८ ऑक्टोंबर रोजी संप मागे घेतला होता. पण अजूनही विविध संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी हा संप सुरुच ठेवल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. पण आता उच्च न्यायालयाचे कामगार संघटनांना एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT