Local Bodies Election Sarkarnama
महाराष्ट्र

Local Bodies Election : भाजप महाअधिवेशनातून 'स्थानिक'च्या निवडणुकीचा शंखनाद करणार

State President BJP Chandrashekhar Bawankule local body elections January 12 Shirdi Ahilyanagar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली असून, शिर्डीतील महाअधिवेशनात त्याची घोषणा होईल, असे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने भाजपने नियोजनाला सुरवात केली असून 12 जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शनिवारपासून भाजपची (BJP) सदस्य नोंदणी मोहीम सुरवात झाली. विधानसभा निवडणुकी अगोदर पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधून रणशिंग फुंकण्यात आले होते. आता शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा शंखनाद होईल.

या महाअधिवेशनाला 15 हजारांहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. तालुका महामंत्रीदेखील या महाअधिवेशनाला बोलविण्यात आले आहेत. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीतच (Shirdi) पक्षाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

भाजपकडून 15 दिवस संघटन पर्व आयोजित करण्यात आले असून सदस्य नोंदणीवर भर देण्यात येईल. खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले टार्गेट पूर्ण झाले की नाही, याचा आढावा घेण्याची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सांगत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या आहेत. निवडणूक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यावर 4 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी निवडणुकांचा तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT