Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूट करण्याचे ठरवले आहे. आज आंतरवली सराटीमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईकडे जाण्याचे नियोजन होणार आहे. शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या मोर्चाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी याचिका करण्यात आली होती. मात्र, ते आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा अंदाज वर्तवत त्यावर बंदी घालणे योग्य नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आडवण्यास आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला.
कोर्टाच्या भूमिकेनंतर राज्य सरकारची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, कोर्टात राज्य सरकारकडून महाधिकवक्ता मिलिंद साठे यांनी बाजू मांडताना गणेशोत्सव सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जरांगेंना आंदोलनाची परवानगी दिली नसल्याचे सांगितले. परवनागीशिवाय मोर्चा काढता येणार नसल्याचे देखील ते म्हणाले.
राज्य सरकारची भूमिकाही जरांगे पाटलांच्या मोर्चाच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यात आझाद मैदानावर देखील आंदोलन करण्यासाठी राज्य सरकारकडून काही नियमावली यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. आंदोलकांना सहानंतर मैदान खाली करावे लागणार आहे. तसेच दक्षिण मुंबईत इतरत्र आंदोलन करता येणार नाही, या नियमाने देखील जरांगे पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आझाद मैदानावर आंदोलनासाठी जो आधी अर्ज करेल त्याला आधी परवानगी देण्याची नियमावलीत उल्लेख आहे.
आहेत. परवानगी दिली अथवा नाही दिली तरी मुंबईला जाणारच असे ते म्हणाले. आज आंतरवाली सराटीत बैठक होत असून या बैठकीत मुंबईला जाण्यासाठी तारीख आणि मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. ज्याला शक्य आहे त्याने मोर्चात यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.