Manoj Jarange Backfut : अवास्तव मागण्या अन् निवडणुकीची भीती संपली; मनोज जरांगेंना शिंदे-फडणवीसांनी कसं एकाकी पाडलं? इनसाईड स्टोरी...

Manoj Jarange vs Eknath Shinde Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यांच्या या आंदोलनापासून सत्ताधारी पक्ष अंतर राखून आहे. प्रत्येक वेळी मध्यस्थाची भूमिका बजवणारी एकनाथ शिंदेंची शिवसेनेने देखील वेगळी भूमिका घेतल्याचे दिसते.
Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Politics : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. मात्र,सरकारकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे जरांगेसाठी संकटमोचक म्हणून उभे राहत होते. त्यांनी जरांगेंच्या पहिल्या आंदोलनावेळी शिंदे यांनी थेट आंतरवाली सराटी गाठून जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडले होते. त्यानंतर जरांगे पाटील हे जेव्हा मुंबईच्या वेशीवर आले होते तेव्हा सगेसोयरेंचा जीआर काढत जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली होती. शिंदे स्वतः त्यावेळी वाशी येथे गेले होते.

मात्र, अवघ्या एका वर्षांत परिस्थिती पूर्ण बदलून गेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करत त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का मराठ्यांनी पुसला, असा दावा केला. राजकारणासाठी मराठ्यांचा शिंदेंनी उपयोग करून घेतला असे देखील ते म्हणाले. त्यामुळे जरांगे आणि शिंदेंमध्ये नेमकं काय बिनसले त्यामुळे जरांगेंचे आंदोलन सुरू असताना शिंदेंनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घटनेचे चौकटीत असेल तेच देणार, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर माझी अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे असतील ते कधीही हिंदूंच्या सणांमध्ये, गणपतीच्या सणामध्ये विघ्न आणणार नाहीत.

जरांगे यांनी मुंबईकडे जाण्याचे नियोजन केले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ येवढीच प्रतिक्रिया देत जरांगेंना जास्त महत्त्व देण्याचे टाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून जरांगे पाटील यांच्यापासून अंतर राखले आहे. अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या देखील त्याच भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनावेळी एकनाथ शिंदेंकडून आंदोलन मागे घेण्यासाठी जे प्रयत्न केले जात होते. ते यावेळी ते करताना दिसत नाहीत. त्यामुळे जरांगे हे एकाकी पडल्याचे चित्र आहे.

Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Radhakrishna Vikhe : जरांगेंवर बोलण्यास विखेंचा नकार, विषयच बदलला...; उद्या आंतरवालीतील बैठक निर्णायक ठरणार?

मनोज जरांगेंच्या अवास्तव मागण्या

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोनापूर्वी आपल्या 13 मागण्या सरकारकपुढे ठेवल्या होत्या. त्यातील 58 लाख नोंदी सापडलेल्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे आणि मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावं आणि याची व्हॅलिडीटी कशी देणार हे पण लगेच स्पष्ट कराव, कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना लगेचच व्हॅलिडिटी द्यावी या प्रमुख मागण्या होत्या.

जरांगे पाटील यांनी केलेल्या या मागण्या कागद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा मागण्या मान्य करण्यास राजकीय नेते देखील मागे हटत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेच हेरले आणि जरांगेपासून आंतर राखले.

जरागें पाटलांची ताकद घटली?

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांनी शेतकऱ्यांना मेळावा घेतला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मेळावा घेऊ नका, म्हणून थेट जाधव यांना फोन लावला. मात्र, मेळावा घेण्यावर ते ठाम राहिले. जरांगे पाटलांना एकप्रकारे हे आव्हानच होते. मात्र, जरांगे पाटील यांनी परभणीला जाण्याची भाषा केली मात्र नंतर आपण जाईपर्यंत मेळावा संपेल त्यामुळे जाणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, हा मेळावा यशस्वीरित्या पार पडला. काही मराठा आंदोलकांनी त्यामध्ये घोषणाबाजी केली. मात्र, हा मेळावा यशस्वी पार पडल्याने जरांगेना पहिल्यासारखा पाठींबा राहिला नसल्याचे मेसेज राजकारण्यांमध्ये गेला.

निवडणूक नसल्याचे राजकारणी बिनधास्त

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी शिल्लक आहे. लगेच कुठलीही मोठी निवडणूक नाही. याआधी झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आंदोलनात मराठा समाज हा जरांगेंसोबत असला तरी तो निवडणुकीत आपल्यासोबत आहे, याचा विश्वास राजकीय नेत्यांना आलाय. त्यामुळे लगेच कुठलीही मोठी निवडणूक नसल्यानेच राजकीय आणि सत्ताधारी नेत्यांना जरांगेकडे दुर्लक्ष करणे शक्य आहे.

शिंदे सर्वसमावेशक राजकारणाकडे

एकनाथ शिंदे हे ठाकरेंशी वैर घेऊन बाहेर पडले, त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवले. ते मुख्यमंत्री देखील झाले. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत त्यांनी आपली प्रतिमा बदलली. मात्र,फक्त मराठा नेता ही त्यांची प्रतिमा राजकारणात फार काळ त्यांना फायदा देणारी ठरणार नाही. सत्तेच्या राजकारणात सर्वच समाजाला सोबत घेणे सोयीचे असते. सत्ता देखील त्यातूनच मिळत असते. त्यामुळे एकनाथ शिदेंनी आपल्या राजकारण काहिसे बदललेले दिसत आहे. त्यातूनच जरांगेंना फारसा प्रतिसाद ते देताना दिसत नाहीत.

ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचे काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक लाभ हा मराठवाड्यात झाला आहे. तेथे जरांगेंच्या आंदोलनापासून साडेतीन लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचे आकडे सरकारनेच जाहीर केले आहेत. मात्र, ज्या मराठ्यांच्या नोंदीच नाहीत त्यांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मराठा समाजातील काही अभ्यासकांकडून जरांगे पाटील यांना विरोध करण्यात येत आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश ही मूळ मागणी सोडून

Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Manoj Jarange Patil : पंकजा मुंडे 'सेफ', धनुभाऊ टार्गेटवर; मनोज जरांगें पाटलांच्या डोक्यात नेमकं काय? मराठवाड्यात नवी चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com