Dhananjay Munde Valmik Karad Suresh Dhas sarkarnama
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar News : 'चंद्रपूरला बीड होऊ देऊ नका...'; दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली

Sudhir Mungantiwa Vs Vijay Wadettiwar : धनंजय मुंडे यांची पक्षांतर्गत चौकशी करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी तीन सदस्यांची समिती स्थापन केल्याची माहिती आहे.

Roshan More

Sudhir Mungantiwar News: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चंद्रपूरला बीड होऊ देऊ नका या वक्तव्यावरून भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात जुंपली आहे. मुनगंटीवार यांनी आपल्या वक्त्याव्याचा सविस्तर खुलासा करताना बीड उल्लेख केला म्हणून संपूर्ण जिल्हाचा वाईट आहे असा होत नसल्याचे सांगितले. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील काही क्षेत्रांमध्ये माफिया घुसले असल्याचे सांगून त्यांनी भविष्यात उद्‍भवणाऱ्या धोक्याकडेसुद्धा लक्ष वेधले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुनगंटीवार यांनी आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ देऊ नका अशी सूचना केली होती. त्यांच्या वक्तव्याचा दाखल देऊन वडेट्टीवार यांनी बीडमध्ये किती भयावह परिस्थिती असल्याचे दिसते याकडे लक्ष वेधले. बीडवरून राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाल्याचे दिसताच मुनगंटीवार यांनी माझे वक्तव्य अर्धवट प्रसारित झाल्याचे सांगितले.

बीडमधील सरपंच देशमुख यांची अमानुष हत्या झाली आहे. त्यामुळे आपण तेथील पोलिसांच्या रिक्त जागा भराव्या, पोलिसांना गाड्या द्यावा, पोलिस गस्त वाढावावी असे सांगितले. सोबतच चंद्रपूरला असा काही प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. चंद्रपूरमध्येही अनेक क्षेत्रांमध्ये माफियांचा शिरकाव झाला आहे. मात्र बीडला बदनामा करण्याचा आपला कुठलाही उद्देश नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

एक दोन घटना घडल्या म्हणून संपूर्ण गावाला नावा ठेवण्यात अर्थ नाही. तेथे सर्वत्र वाईटच आहे असेही होत नाही. पूर्वी गुंडागर्दी झाली की बिहार असा उल्लेख केला जायचा. मात्र त्यामुळे संपूर्ण बिहार राज्यात गुंडागर्दी असे होत नाही. बिहारने अनेक आएएस, आपीएस अधिकारी देशाला दिले आहेत. काही घटना घडत असतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आणि गावाची बदनामी होते. ती होऊ नये यासाठी आपण बीडचे नाव घेतले, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

धनंजय मुंडेंची पक्षातंर्गत चौकशी

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मुंडे यांना पालकमंत्रीपदसुद्धा देण्यात आलेले नाही. मुंडे यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची पक्षांतर्गत चौकशी करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी तीन सदस्यांची समिती स्थापन केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT