Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील संतापले; म्हणाले, 'हे खपवून घेणार नाही, राजकीय दबावाला बळी पडू नका'

Chandrakant Patil angry News : माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षांपासून महापालिका वेगवेगळ्या भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याचे जाहीर करते. मात्र, त्यानंतर पुढील दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आमदार चंद्रकांत पाटील चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमीत पाणीपुरवठा करावा, अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरीक अशी संयुक्त बैठक कोथरूडमधील अंबर हॉल येथे झाली. यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोथरूडमधील विविध भागातील पाणी पुरवठ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षांपासून महापालिका वेगवेगळ्या भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याचे जाहीर करते. मात्र, त्यानंतर पुढील दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

Chandrakant Patil
Shivsena News : फडणवीस, अजितदादांच्या पक्षाप्रमाणेच आता शिंदेंचे मंत्रीही 'कॉमन मॅन'साठी मैदानात

त्यासोबतच बालेवाडी गावठाणमध्ये काही ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तर एसएनडीटी येथील समान पाणीपुरवठा योजनेतंर्गत पाण्याची टाकी उभारली असली, तरी ते काम निकृष्ट झाले असून, टाकी सुरु होण्यापूर्वीच गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासोबतच अनेक भागात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आणले.

Chandrakant Patil
BJP News : लातूर भाजपमध्ये जुना-नव्याचा वाद पेटला; विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी फिल्डिंग

त्यावर पाटील यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. पुणे महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पहिली पाण्याची टाकी बाणेर बालेवाडीमध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर उर्वरित पुण्याला मार्गदर्शक ठरेल, असे याचे कार्यन्वयन सुरू झाले. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक घरात मीटर लावण्याचा निर्णय झाला असून, त्याचेही काम सुरू होईल.

Chandrakant Patil
Ajit Pawar : पुणे वाहतूक कोंडीत तिसऱ्या क्रमांकावर, अजितदादा 'अ‍ॅक्शन मोड'वर, 100 दिवसांत...

'दुसरीकडे पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी वारंवार येत आहेत. या तक्रारीमध्ये अनेक भागात राजकीय दबावामुळे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील', अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Chandrakant Patil
Shinde group criticism: : 'उद्धव ठाकरेंना आमदारांनी सोडून जाऊ नये म्हणून खेळी..' शिंदेंच्या शिलेदाराने फटकारले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com