Deputy CM Sunetra Pawar news Sarkarnama
महाराष्ट्र

DCM Sunetra Pawar: अजितदादांच्या खुर्चीवर बसल्यानंतर सुनेत्रावहिनींची भावूक पोस्ट...पार्थ पवारांना अश्रू अनावर

Deputy CM Sunetra Pawar News: सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपेन,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Sunetra Pawar takes charge as DCM: अजित पवार यांच्या अकाली' ए्क्झिट'मुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने नुकताच झाला. सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार या अजितदादांच्या आठवणीने भावूक झाल्या.

सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपेन,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील अजित पवार यांच्या दालनात गेल्या. या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे भावुक झाले. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या खुर्चीवर बसून पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असा शब्द सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.

मंत्रालयात जाण्यापूर्वी त्या आज प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेत गणरायाचरणी नतमस्तक झाल्या. सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले, पूजा केली. लोककल्याणाचे, विकासाचे कार्य निरंतर पुढे हाकण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना केली, अशी माहिती सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT