Sunetra Pawar’s unexpected call to Harshvardhan Sapkal fuels speculation ahead of the Baramati by-election. sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, काँग्रेसच्या बड्या नेत्याला केला फोन, बिनविरोधसाठी शेवटचा प्रयत्न

Baramati By-Election Congress : बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारी मागे घेणार की नाही याकडे लक्ष असणार आहे.

Roshan More

Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 53 उमेदवारी अर्जांपैकी पाच जणांचे अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या विषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सुत्रे हाती घेत बिनविरोधसाठी शेवटचा प्रयत्न केला.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, काँग्रेस उमदेवाराने माघार घ्यावी यासाठी सुनेत्रा पवारांनी पुन्हा एका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती आहे. ही निवडणूक लढण्याचा निर्णय दिल्लीत घेतला आहे. त्यामुळे या संदर्भात दिल्लीतील हायकमांडशी चर्चा करावी लागले, असे सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना सांगितल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून आकाश मोरे हे सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढत आहेत. त्यांनी महायुती सरकारने अजित पवारांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा मी उमेदवारी अर्ज लगेच मागे घेतो, अशी अट घातली होती. मात्र, या संदर्भात त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या निधनानंतर तो घातपात होता की अपघात, या संदर्भात कोणतेही गांभीर्य दाखवलेले नाही. साधी एफआयआर दाखल केली जात नाही, गुन्हा नोंदवला जात नाही आणि सखोल चौकशीही केली जात नाही.

'ब्लॅक बॉक्स'चे नेमके काय झाले, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तपास यंत्रणांकडून कोणतीही तर्कसंगत उत्तरे मिळत नाहीत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय विरोधाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बारामतीमध्ये आमची उमेदवारी दाखल केली आहे.

भाजपकडून दिशाभूल

सपकाळांनी सांगितले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT