sunetra pawar delhi visit Sarkarnama
महाराष्ट्र

sunetra pawar delhi visit : ‘डबल रोल’वर सुनेत्रा पवार? उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं; खासदारकीबाबत तटकरेंनी दिली मोठी अपडेट

Sunetra Pawar Did Not Resign as MP After Delhi Visit: Sunil Tatkare : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नसल्याची माहिती अजित पवार राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

Pradeep Pendhare

ajit pawar ncp news : अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर पहिला दिल्ली दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली.

या वेळी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बरोबर होते. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील खासदारकीबाबत सुनील तटकरे यांनी मोठी अपडेट दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र पार्थ पवार हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पहिल्यादांचा दिल्ली दौरा केला. सुनेत्रा पवार यांचा हा दौरा पूर्णपणे राजकीय होता. त्यामुळे दिल्लीत त्यांच्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले होते. पार्थ पवार खासदार होणार, अशी चर्चा या दौऱ्यामागे महाराष्ट्रात रंगली होती.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील खासदारकीबाबत माहिती देताना, सुनेत्रावहिनींनी अजून खासदारकीचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह, सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीबाबत पक्ष पातळीवर निर्णय होईल, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु खासदार तटकरे यांनी, या चर्चांचं खंडण करताना, सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्या आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे राज्यसभेचे सभापती आहे. त्यामुळे प्रोटोकाॅलनुसार सुनेत्रावहिनींना त्यांची भेट घेतली. परंतु राजीनामा दिलेला नाही, हे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री असताना, खासदारकी कशी, या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले, "कोणत्याही व्यक्तीला मंत्रीपद मिळाल्यानंतर, त्या व्यक्तीला सभागृहाचा सदस्य होण्यासाठी सहा महिन्याचा अवधी असतो. अशा वेळेला इतर सहभागृहाचं सदस्यपद असेल, तर ते कायद्यानं ठेवता येतं." अजितदादा 1991 मध्ये लोकसभेला सदस्य झाले, त्यावेळी पवारसाहेब देशाचा संरक्षण मंत्री झाले. त्यावेळी दादा हे सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. त्यावेळी दादा लोकसभेचे सदस्य होते. असे अनेक उदाहरण आहेत, असेही सुनील तटकरे यांनी म्हटलेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीत काय ग्वाही दिली. यावर सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही एनडीएमध्ये आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून, एनडीएचे घटकपक्ष म्हणूनच आम्ही काम करत आहोत." अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT