Sunetra Pawar Amit Shah Meeting Finance Ministry sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : अर्थमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार आग्रही, अमित शाहांची घेणार भेट, CM फडणवीस...

Sunetra Pawar Amit Shah Meeting Finance Ministry : अर्थमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत. भाजपने आपल्याकडे ठेवलेले हे खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Roshan More

NCP News : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडील अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले. हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. मात्र, सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळालेले नाही.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे खाते मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, यावर काही निर्णय होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व मंत्री आणि आमदार देखील हे खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे म्हणून आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थखाते पु्न्हा मिळावे यासाठी सुनेत्रा पवार या गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 'साम' टिव्हीने या विषयी सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

गृहमंत्री अमित शाह हे हिंदी संमेलनासाठी मुंबईत येणार आहे. तेव्हा त्यांची सुनेत्रा पवार भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अर्थ खात्याबाबत खलबतं झाले.यामध्ये भाजपला तात्पुरत्या स्वरूपात दिलेले अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे घ्यावे, असा सूर सर्व नेत्यांनी लावला.

राष्ट्रवादी काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. बूथपासून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जातो आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना देखील संघटनात्मक बांधणीत जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT